Zombivli Teaser: मराठीतील पहिला झोम्बीपट 'झोंबिवली' सिनेमाचा टीझर आऊट (Watch Video)
हॉलिवूडमधील झोम्बी चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर मराठीतही झोम्बीपट बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या आगळ्यावेगळ्या सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित 'झोंबिवली' (Zombivli) सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हॉलिवूडमधील झोम्बी चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर मराठीतही झोम्बीपट बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या आगळ्यावेगळ्या सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात अमेय वाघ (Ameya Wagh), ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचा टीझर काहीसा भीतीदायक आणि सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणार आहे.
मुंबई सारख्या एका लोकप्रिय आणि गजबजलेल्या शहराचा ताबा घेणाऱ्या झोंबीवर हा सिनेमा आधारीत आहे. टीझरमध्ये तुम्ही पाहु शकाल की, अमेय वाघ अतिशय भयभीत होऊन पोलिस स्टेशनमध्ये झोंबी विषयी तक्रार करताना दिसत आहे. त्याच्यासोबत वैदेही परशुरामी देखील आहे. तर ललित प्रभाकर अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.
"झॉम्बी आले शहरात, घुसण्या आधी घरात, गाठा त्यांना, 30 एप्रिलला जवळच्या थेटरात.." अशा आशयासह हा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
पहा टीझर:
यौडली फिल्म्सने सिनेमाची निर्मिती केली असून 30 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मुंबई आणि लातूर मध्ये सिनेमाचे शूटिंग करण्यात आले आहे. दरम्यान, टीझर सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवतो.
यापूर्वी आदित्य सरपोतदार 'फास्टर फेणे', 'माऊली', 'क्लासमेट्स' या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तर ललित प्रभाकरने 'आनंदी गोपाळ', 'हम्पी', 'स्माईल प्लीज' सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे. अमेय वाघ याने 'मुरांबा', 'गर्लफ्रेंड', 'फास्टर फेणे' सिनेमातून प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. तर वैदेही परशुरामी हिने अभियन आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.