मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु च्या साडीतील अंदा पाहून चाहत्याने घातली लग्नाची मागणी; पहा व्हिडिओ
Rinku Rajguru (PC - Instagram)

आर्ची म्हणजे रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती आपले वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रिंकूच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साडीतील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतील रिंकूच्या अदा पाहून एका चाहत्यांनी तिला चक्क लग्नाची मागणी घातली आहे.

या व्हिडिओमध्ये रिंकूने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीत ती प्रचंड सुंदर दिसत आहे. यात तिने केसात गजराही माळला आहे. स्लो मोशन मधील साडीतील अंदानी चाहत्यांना भुरळ पाडली आहे. या व्हिडिओला रिंकूच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट केल्या आहेत. (हेही वाचा - जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि बोनी कपूर ची कोरोना रिपोर्ट आले समोर, घरातील अन्य 3 लोकांना COVID-19 ची लागण)

 

View this post on Instagram

 

😇💃

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहून रिंकूच्या एका चाहत्याने चक्क तिला लग्नाची मागणी घातली आहे. यात त्याने ‘माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का?’ असं प्रश्न विचारला आहे. त्याच्या या प्रश्नाला रिंकूने काहीही उत्तर दिलेलं नाही.

लॉकडाऊन काळात अनेक मराठी तसेच बॉलिवुड कलाकार विविध व्हिडिओ शेअर करत असतात. रिंकूने देखील लॉकडाऊन काळातील अनेक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी रिंकूने आईला स्वयंपाकात मदत करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या चाहत्यांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरात राहण्याचा संदेश दिला होता.