Prajakta Mali (Photo Credits: Instagram)

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'जुळून येती रेशीमगाठी' मधून घराघरात पोहोचलेली मराठीमोठी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). या मालिकेत ती एका सोज्वळ, निरागस सूनेच्या भूमिकेत दिसली होती. मात्र प्राजक्ता जितकी सोज्वळ भूमिकांमुळे प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या हॉट आणि बिनधास्त लूक साठी सुद्धा. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटमधून आपला एक हॉट फोटो शेअर केला.

या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. हा फोटो पाहताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्स मधून कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.

यात काहींनी तिच्यावर शायरी तयार केली आहे. तर काही म्हणाले आहेत की, तू सौंदर्यांचे वर्णन होऊच शकत नाही, तू खूपच सेक्सी दिसत आहे. अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा - मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पुन्हा एकदा कोर्टाकडून समन्स

प्राजक्ताने आतापर्यंत ब-याच मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये स्वत:ची अशी छाप सोडली आहे. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे.