Actor Shreyas Talpade Reacts to His Death Hoax: 'मी जिवंत आहे'; निधनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना श्रेयस तळपदे ने सुनावलं
अभिनेता श्रेयस तळपदेच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या, त्यावर आता खुद्द अभिनेत्याने पोस्ट करून तो हयात असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
Shreyas Talpade Reacts to Death Rumours: अभिनेता श्रेयस तळपदेच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या, त्यावर आता खुद्द अभिनेत्याने पोस्ट करून तो हयात असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. श्रेयसने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने म्हटलं आहे की, 'मी जिवंत आहे, आनंदी आहे व निरोगी आहे हेच मी सर्वांना सांगू इच्छितो. माझ्या निधनाची माहिती देणाऱ्या एका व्हायरल पोस्टबद्दल मला कळालं. विनोद मी समजू शकतो, पण जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो तेव्हा खरा त्रास होतो. एखाद्याच्या विनोदातून सुरू झालेली गोष्ट आता अनावश्यक काळजीचं निर्माण करत आहे, तसेच माझ्यासाठी काळजी करणाऱ्या लोकांच्या, खासकरून माझ्या कुटुंबाच्या भावनांशी खेळ होत आहे.' (हेही वाचा: Shreyas Talpade : "आरोग्याची एवढी काळजी घेऊन ही...", हृदयविकाराचा झटका आणि कोरोना लसीबद्दल श्रेयस तळपदेकडून अनेक शंका उपस्थित)
'माझी लहान मुलगी रोज शाळेत जाते, ती आधीच माझ्या आरोग्याबद्दल काळजीत आहे, ती सतत मला प्रश्न विचारत असते. या खोट्या बातमीमुळे तिची भीती आणखी वाढतेय. तिला तिच्या शाळेत याबद्दल शिक्षकांकडून, वर्गमित्रांकडून प्रश्न विचारण्यात येत आहेत. तिला आम्ही कुटुंब म्हणून सांभाळण्याचा प्रयत्न करतोय,'असं श्रेयस म्हणाला.(हेही वाचा: Shreyas Talpade Gets Heart Attack: लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; झाली अँजिओप्लास्टी- Reports)
श्रेयस तळपदे याची इन्स्टा पोस्ट
दरम्यान, डिसेंबर 2023 रोजी त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारानंतर तो बरा झाला आणि आता ठणठणीत आहे, पण तरीही त्याला पोस्ट करून तो हयात असल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.