IPL Auction 2025 Live

सरसेनापती हंबीरराव ग्रास आर्ट पाहून अभिनेता प्रविण तरडे भारावला, शेतकरी कलाकाराला दिला 'हा' शब्द; पहा त्याची फेसबूक पोस्ट

महाराष्ट्रात अभयसिंह अडसूळ या शेतकरी मित्राच्या संकल्पनेतून कुंडलिक राक्षे या शेतकऱ्याने गव्हाच्या शेतीमध्ये 'सरसेनापती हंबीरराव' हे ग्रास आर्ट साकारलं आहे.

Sarsenapati Hambirrao | Photo Credits: Facebook/ Pravin tarde

'आरा..रा.. रा.. खतरनाक' फेम प्रविण तरडे ( Pravin Tarde) याची लोकप्रियता त्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील रसिकांमध्येही प्रचंड आहे. 'मुळशी पॅटर्न', 'देऊळबंद नंतर लवकरच प्रविण तरडे सरसेनापती हंबीरराव मोहिते (Sarsenapati Hambirrao) या चरित्रपटातून रसिकांसमोर येणार आहे. महाराष्ट्रात अभयसिंह अडसूळ या शेतकरी मित्राच्या संकल्पनेतून कुंडलिक राक्षे या शेतकऱ्याने गव्हाच्या शेतीमध्ये 'सरसेनापती हंबीरराव' हे ग्रास आर्ट साकारलं आहे. कुंडलिक राक्षेच्या या मेहनतीचं कौतुक करत त्याने ग्रास आर्ट्चा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. दरम्यान त्यासोबतच 'कुंडलिक मी तुला ओळखत नाही पण माझा शब्द आहे तुला , तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार ..' असा संदेश लिहला आहे.

'सरसेनापती हंबीरराव मोहिते' हा मराठी सिनेसृष्टीतील आगामी बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमामध्ये प्रवीण तरडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी देखील त्याच्यावर असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे पोस्टर रीलीज करण्यात आले होते. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा अंगावर शहारा आणणार्‍या आहेत. हेदेखील वाचा- Sarsenapati Hambirrao Poster: शिवजयंती निमित्त प्रविण तरडे यांनी शेअर केले 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमाचे पोस्टर.

प्रविण तरडे यांची फेसबूक पोस्ट

‘सरसेनापती हंबीरराव’सिनेमा लव्करच रसिकांच्या भेटीला येणार आहे. संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा जून 2020 मध्ये प्रदर्शित होणंं अपेक्षित होते मात्र आता कोरोनाव्हायरस लॉकडाऊन आणि सध्याची स्थिती पाहता  ही तारीख लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.