'रेगे' फेम आरोह वेलणकर सोशल मिडियवर शेअर केला आपल्या गोंडस मुलासोबतचा पहिला फोटो

या फोटोमध्ये आरोहने आपल्या मुलाला हातात घेतले आहे. आरोहच्या हातात झोपलेला अर्जुन खूपच गोंडस आणि निरागस दिसत आहे

Aroh Velankar (Photo Credits: Instagram)

'रेगे' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता आरोह वेलणकर नुकताच बाबा झाला आहे. 2 मार्चला त्याने सोशल मिडियाद्वारे आपण बाबा झाल्याची बातमी दिली होती. त्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी अंकिता चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर काही दिवसांनी आरोहने आपल्या बाळाचा हाताचा फोटो शेअर करत वेलकम 'अर्जुन वेलणकर' असे म्हणत आपल्या मुलाचे नाव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. आरोहचा मुलगा कसा दिसत असेल याच्या त्याच्या चाहत्यांनी मनात अनेक प्रतिमा बनविल्या होत्या. मात्र काल अखेर आरोहने सोशल मिडियावर आपल्या मुलांची म्हणजेच अर्जुनची पहिली झलक दाखवली.

आरोहने आपल्या मुलासोबत काढलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आरोहने आपल्या मुलाला हातात घेतले आहे. आरोहच्या हातात झोपलेला अर्जुन खूपच गोंडस आणि निरागस दिसत आहे.हेदेखील वाचा- डॅडी अरुण गवळी झाले आजोबा! अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांना कन्यारत्नाचा लाभ

 

View this post on Instagram

 

A post shared by Aroh Welankar (@arohwelankar)

हा फोटो शेअर करुन आरोहने 'अर्जुन तुझ्या बाबांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे' असे कॅप्शन दिले आहे.

आरोहची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आरोहच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. गायत्री दातार, रसिका सुनिल, ऋतुजा बागवे, प्रार्थना बेहरे, अभिनय बेर्डे यांनी कमेंटमध्ये काही इमोजी पोस्ट केले आहेत.

आरोहच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो मिताली मयेकरसह झी मराठीवरील 'लाडाची लेक गं' या मालिकेत काम करत आहे.



संबंधित बातम्या