ZolZaal Marathi Movie: 'झोलझाल' चित्रपटातील विनोदी भूमिकेतून अभिनेता अमोल कागणे येतोय रसिक प्रेक्षकांच्या भेटीला

जय आणि वीरूची ही थोडक्यात गोष्ट आहे. जय हा वीरूचा मोठा भाऊ असून तो त्याच्या प्रत्येक गोष्टीत वीरूला सहभागी करतो. चित्रपटातील प्रत्येक सिन हा कॉमेडी आहे. चित्रपटात जस जशा घटना घडत जातात तसे विनोदाचे पदर उघडत जातात.

Amol Kagne (Photo Credit - Instagram)

'हलाल', 'भोंगा', 'बेफाम', 'वाजवूया बँड बाजा', 'लेथ जोशी' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीनंतर अमोल कागणेने (Amol Kagne) 'बाबो' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल असून येत्या १ जुलैला पुन्हा एकदा तो नव्याकोऱ्या आणि हास्यांची मैफिल घेऊन 'झोलझाल' (Zolzaal) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'झोलझाल' या चित्रपटात अमोल जय या पात्राची भूमिका साकारत आहे. जय आणि वीरूची ही थोडक्यात गोष्ट आहे. जय हा वीरूचा मोठा भाऊ असून तो त्याच्या प्रत्येक गोष्टीत वीरूला सहभागी करतो. चित्रपटातील प्रत्येक सिन हा कॉमेडी आहे. चित्रपटात जस जशा घटना घडत जातात तसे विनोदाचे पदर उघडत जातात. अमोलने पहिल्यांदाच या चित्रपटातून विनोदी भूमिका साकारली आहे, याआधी अमोलने गंभीर भूमिकांमध्ये किंवा आशयघन कथांमध्ये काम केले आहे. अमोल उत्कृष्ट निर्माता तर आहेच मात्र तो एक उत्तम अभिनेता देखील आहे, अभिनयाचा प्रवास त्याने सुरु केला असून लवकरच तो 'झोलझाल' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्टीस्टारर 'झोलझाल' या सिनेमात बऱ्याच दिग्गज कलाकारांनी काम केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by AMOL LAXMAN KAGNE (@amol_kagne_official)

या चित्रपटात काम करण्याचा मोठा ब्रेक त्याला चित्रपटाचे निर्माते गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता यांनी दिला असून दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी सेटवर खूपच सांभाळून घेतल. 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' निर्मित आणि 'अमोल कागणे स्टुडिओ' आणि 'रोलिंगडाईस' प्रस्तुत हा चित्रपट अमोलसाठी कायमच अविस्मरणीय असेल यांत शंकाच नाही. (हे देखील वाचा: Aathava Rang Premacha Trailer: आठवा रंग प्रेमाचा' चित्रपटात रिंकूचा वेगळा लूक, ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला)

'झोलझाल' हा सिनेमा मल्टीस्टारर असल्याने यांत मनोज जोशी, मंगेश देसाई, उदय टिकेकर यासारख्या दिग्गज कलाकार आहे. येत्या १ जुलैला 'झोलझाल' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून या चित्रपटात तब्ब्ल २२ कलाकारांनी मिळून काय झोल केलाय हे पाहायला तुम्हाला चित्रपटगृहात जावेच लागेल.'