फिल्मफेअर पुरस्कार पटकावल्यानंतर अभिनय बेर्डेने शेअर केली खास पोस्ट
अभिनय बेर्डेने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला भावूक करणारा खास फोटो
हिंदीप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतही मानाचा समजल्या जाणार्या फिल्मफेअर अवॉर्ड्सचं मराठी कलाकारांप्रमाणेच त्यांच्या चाहत्यांनाही कौतुक असते. प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस असणार्या मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्सचं यंदाचं चौथं वर्ष आहे. नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये नव्या उमद्या कलाकारांनी अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरले आहे.
अभिनय बेर्डेची खास पोस्ट
विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डेने अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमधुन काम केले. त्याच्या अभिनयाची छाप आजही रसिकांच्या मनावर आहे. यंदाच्या मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेनेही फिल्मफेअर अवॉर्ड मिळवला. 'ती सध्या काय करते' या सिनेमासाठी बेस्ट डेब्यू म्हणजेच सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पणाचा पुरस्कार देऊन अभिनयला गौरवण्यात आलं
अभिनयने पुरस्कार पटकावल्यानंतर काही वेळातच एक खास पोस्ट शेअर केली. 1985 साली लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेअर मिळाला होता. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या ट्रॉफीच्या बाजूला अभिनयने स्वतःची ट्रॉफी ठेवून ' लाईक अ फादर लाईक अ सन' असं म्हणतं खास पोस्ट शेअर केली आहे.
यंदाच्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये अभिनय बेर्डे स्मिता गोंदकर आणि मयुरेश पेमसोबत थिरकताना दिसणार आहे. फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2018 विजेत्यांची यादी