Aatpadi Nights Poster Release: सुबोध भावे च्या नव्या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित

पोस्टरमध्ये चित्रपटाचे शीर्षक बंद असलेल्या घराच्या दारावर दाखवले गेले आहे.

Subodh Bhave | (Instagram)

बायोपिक किंग नावाने प्रसिद्ध असणारा एक उत्तम अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोधने चित्रपट तर गाजवलेच पण त्याचसोबत तो टेलिव्हिजन क्षेत्रातही तितकाच लोकप्रिय ठरला. त्याच्या 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळच घातलं. आता मात्र तो एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहे. नितीन विजय सुपेकर दिग्दर्शित ‘आटपाडी नाईट्स’ या आगामी मराठी चित्रपटाचा पोस्टर सुबोधने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सुबोधने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेला या पोस्टरचा लुक लक्ष वेधून घेतो. पोस्टरमध्ये चित्रपटाचे शीर्षक बंद असलेल्या घराच्या दारावर दाखवले गेले आहे. हा पोस्टर शेअर करताना सुबोध लिहितो, ""एका महत्त्वाच्या विषयावरचा गोड चित्रपट!हा चित्रपट प्रस्तुत करण्याचा मनापासून आनंद! मायदेश मीडिया आणि सुबोध भावे सादर करीत आहेत- "आटपाडी नाईटस्"

 

View this post on Instagram

 

एका महत्त्वाच्या विषयावरचा गोड चित्रपट! हा चित्रपट प्रस्तुत करण्याचा मनापासून आनंद!😊😊 मायदेश मीडिया आणि सुबोध भावे सादर करीत आहेत- "आटपाडी नाईटस्" #AatpadiNights #AatpadiNightsPoster #PremachaZhangadgutta #MaaydeshMedia #27Dec

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

सुबोध भावे या चित्रपटाचा प्रेझेंटर असून सयाली संजीव, छाया कदम, प्रणव रावराणे, आरती वडागबळकर, संजय कुलकर्णी आणि विठ्ठल काळे हे सर्व कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Exclusive: यापुढे बायोपिक करणार नाही- सुबोध भावे

मायेदेशमेडिया यांच्या बॅनरखाली तयार केलेली मराठी सिनेमाचा सुपरस्टार सुबोध भावे हाही सादर करतो. अद्याप चित्रपटाचं कथानक उघड केलं नसलं तरी ‘आटपाडी नाईट्स' च्या फर्स्ट लूक पोस्टरने सोशल मीडियावर मात्र चर्चा रंगविली आहे. हा चित्रपट 27 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.