Aastad Kale-Swapnali Patil Wedding: आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांचे झाले कोर्ट मॅरेज, अभिनेत्री हर्षदा खानविलकरने शेअर केला 'हा' क्युट फोटो
या दोघांचा मॅरेज सर्टिफिकेट सही करतानाचा फोटो हर्षदा खानविलकरने शेअर करुन दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बिग बॉस मराठी सिजन 1 (Bigg Boss Marathi Season 1) चा स्पर्धक आस्ताद काळे (Aastad Kale) याचे नुकतेच शुभमंगल सावधान झाले आहे. अभिनेत्री स्वप्नाली पाटील (Swapnali Patil) हिच्यासोबत आस्तादने कोर्ट विवाह (Court Marriage) केला आहे. कोविड-19 चा धोका लक्षात घेता या दोघांनी कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हे लग्न जरी धुमधडाक्यात झाले नसले तरीही लग्नापूर्वीचे सर्व विधी या दोघांच्या घरी साग्रसंगीत पार पडले. या दोघांचा मॅरेज सर्टिफिकेटवर सही करताना क्युट फोटो त्यांची मैत्रिण अभिनेत्री हर्षदा खानविलकर हिने शेअर केला आहे.
आस्ताद आणि स्वप्नाली दोघांनी छान लग्नाचा ड्रेस परिधान केला असून दोघेही खूप सुंदर दिसत आहे. या दोघांचा मॅरेज सर्टिफिकेट सही करतानाचा फोटो हर्षदा खानविलकरने शेअर करुन दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.हेदेखील वाचा- Aastad Kale-Swapnali Patil Wedding: बिग बॉस मराठी 1 मधील आणखी एक स्पर्धक चढणार बोहल्यावर, लग्नासाठी निवडला प्रेमाचा दिवस!
लग्नापूर्वी आस्ताद आणि स्वप्नाली यांच्या केळवणाचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत होते. त्याचसोबत स्वप्नालीचा मेहंदी कार्यक्रमाचे फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल होत होते.
आस्ताद आणि स्वप्नाली पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी प्री वेडिंग फोटोशूटही केले होते. त्यानंतर सगळीकडे यांच्या लग्नाची चर्चा होती. आस्ताद आणि स्वप्नाली स्टार प्रवाह वरील 'पुढचं पाऊल' या मालिकेत एकत्र दिसले होते.
आस्तादच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तो पुढचं पाऊल, सरस्वती, असंभव, वादळवाट, अग्निहोत्र या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर त्याने फर्जंद, दमलेल्या बाबांची कहाणी, प्लॅटफॉर्म या मराठी चित्रपटात देखील काम केले आहे.