सातारचा सलमान सिनेमाचे Title Song प्रेक्षकांच्या भेटीला; शिवानी सुर्वे, सायली संजीव आणि सुयोग गोऱ्हे यांचा भन्नाट कल्ला (Watch Video)

छोट्या गावातील तरुणाची मोठी स्वप्ने मांडणारा सिनेमा, हेमंत ढोमे (Hemanth Dhome) लिखित दिग्दर्शित सातारचा सलमान (Satarcha Salmam) येत्या 11ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे, पण तत्पूर्वी आला सातारचा सलमान' हे सिनेमाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.सुयोग गोऱ्हे सोबतच शिवानी सुर्वे आणि सायली संजीव या तिघांचा अवली आणि भन्नाट डान्स बघायला मिळत आहे

Aala Satarcha Salman Title Song (Photo Credits: Youtube)

छोट्या गावातील तरुणाची मोठी स्वप्ने मांडणारा सिनेमा, हेमंत ढोमे (Hemanth Dhome) लिखित दिग्दर्शित सातारचा सलमान (Satarcha Salmam) येत्या 11ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे, पण तत्पूर्वी टीझर, स्टार कास्ट यामुळे सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे. अशातच आता सिनेमाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'आला सातारचा सलमान' या गाण्यात सुयोग गोऱ्हे (suyog Gorhe), सोबतच शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि सायली संजीव (Sayli Sanjeev) या तिघांचा अवली आणि भन्नाट डान्स बघायला मिळत आहे. वास्तविक परफॉर्मन्स सोबतच गाण्याचे बोल देखील तितकेच फंडू आहेत, आदर्श शिंदे (Aadarsh Shinde)  याचा दमदार आवाजात क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) लिखित आणि अमितराज (Amitraj) यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याच्या बिट्स ऐकताच नाचण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही.

गाण्याचे चित्रीकरण सुद्धा लक्षवेधी आहे, मूळ सिनेमाची कथा हीच अमित काळभोर या तरुणाच्या आयुष्यावर असल्याने गाण्यात सुद्धा असाल मराठमोळ्या बाजात, ढोल ताशा, जत्रा असे दृश्य पाहायला मिळत आहे.

आला सातारचा सलमान (Watch Video)

आजवर गर्लफ्रेंड, बसस्टॉप, आम्ही बेफिकर, शेंटिमेंटल, कृतांत यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या समोर आलेला 'सुयोग गोऱ्हे' हा सिनेमात मुख्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.तर बिग बॉस नंतर वारंवार चर्चेत असणारी शिवानी सुर्वे, काही दिया परदेस मधील सायली संजीव या देखील सिनेमाचा भाग आहे.

आला सातारचा सलमान हे गाणं 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आले असून आतापर्यंत याला तब्बल 27 हजार वेळा पाहण्यात आले आहे. यासोबतच लोकांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच सकारत्मक आहेत. केवळ एका गाण्याने इतका कल्ला झाल्यावर मूळ सिनेमा प्रदर्शित कसा असेल हे पाहण्यासाठी सर्वांमहदये उत्सुकता आहे पापं त्यासाठी तुम्हालाही 11 ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.