Lockdown Diaries: विराट कोहली आणि कुटुंबीयांसह अनुष्का शर्माने खेळला Ludo, विनोदी मार्गाने बॉलीवूड अभिनेत्रीने स्वीकारला पराभव

अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला ज्यात ती, विराट आणि तिचे पालक ऑनलाईन 'लुडो' खेळाचा आनंद घेताना दिसले. अनुष्काने इन्स्टाग्राम स्टोरीवर या खेळाचा फोटो शेअर करताना लिहिले,"मी हरत नाही. मी घरी राहून सोशल डिस्टंसिंगचा सराव करीत आहे."

विराट कोहली-अनुष्का शर्मा (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळे नागरिकांना घरामध्येच राहण्यास सांगितले गेले असल्याने सर्व जण आपल्या प्रियजनांसह आणि कुटूंबासमवेत काही काळ घालवून या वेळेचा उत्तम उपयोग करीत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हेसुद्धा क्वारंटाईचा चांगला उपयोग करत आहे. अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला ज्यात ती, विराट आणि तिचे पालक ऑनलाईन 'लुडो' (Ludo) खेळाचा आनंद घेताना दिसले. यात कोहली आघाडीवर दिसत आहे, तर त्याची बॉलिवूड अभिनेत्री पत्नी अनुष्काची स्थिती सर्वात वाईट दिसत आहे. तथापि, तिने त्या मागे एक महत्त्वाचे रहस्य उघड केले आहे. कदाचित क्वचितच असे असेल की ज्याने बालपणात लुडो खेळला नसेल. लुडो यावेळी प्रत्येक घरातील खेळांचा राजा बनला आहे आणि या खेळाची ऑनलाइन आवृत्ती 90 च्या दशकाच्या मुलांची आवडती बनत आहे. यामध्ये आता अनुष्का-विराटही मागे राहिले नाही आणि ते ही घरात राहून या खेळाचा आनंद लुटत आहे. (लॉकडाउनमध्ये पानी-पुरी आणि बेसन बर्फीचा आनंद घेत आहे विराट कोहली-अनुष्का शर्मा, पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी)

अनुष्काने इन्स्टाग्राम स्टोरीवर या खेळाचा फोटो शेअर करताना लिहिले,"मी हरत नाही. मी घरी राहून सोशल डिस्टंसिंगचा सराव करीत आहे."

अनुष्का शर्माची इंस्टा स्टोरी (Photo Credit: Instagram)

दरम्यान, विराट-अनुष्का घरात राहुन क्वारंटाइनचा आनंदच लुटत नाही तर कोविड-19 विषयी सामाजिक भान निर्माण करीत आहेत. त्यांनी वेळोवेळी सोशल मीडियावर आपल्या देशातील लोकांना घरीच राहून स्वतःचे आणि इतरांचे प्राण वाचवावे आवाहन केले. कोविड-19 विरुद्ध भारत लढायला मदत करण्यासाठी या जोडप्याने पंतप्रधान केअर आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री रिलीफ फंडाला अज्ञात रक्कम दान केली. नुकतंच विराटने एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तो मास्क बाबत जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत होता. या व्हिडिओमध्ये सध्याचे आणि माजी भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश होता. त्यांनी प्रत्येकाला सरकारचे आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याचेही आवाहन केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif