Lata Mangeshkar यांच्या आवाजातील रेकॉर्ड केलेलं शेवटचं राम भजन गुंजणार अयोद्धेच्या राम मंदिर उद्घाटन प्रसंगी!

या क्षणी उपस्थितांना लता दीदींचा आवाज ऐकायला मिळेल.

Lata Mangeshkar | (photo Credit - Twitter/ANI)

भारतरत्न आणि देशाची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज दैवी होता आणि आजही जसा एक क्षण नाही जेव्हा जगाच्या पाठीवर कुठे तरी  त्यांचं गाणं सुरू नाही. वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या लतादीदींची एक इच्छा मात्र अपूर्ण राहिली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार लता दीदींना अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये उद्घाटन प्रसंगी हजर रहायचं होतं. पण आता हे शक्य नसले तरीही त्यांचा आवाज मात्र गुंजणार आहे.  बॉलिवूड हंगामाला दिलेल्या माहितीनुसार, लतादीदींनी त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये भजन, श्लोक रेकॉर्ड केले आहेत. त्यांचा हा रेकॉर्डेड आवाज राम मंदिरामध्ये आता घुमणार आहे.

जानेवारी 24 मध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्ताच्या आसपास राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या क्षणी उपस्थितांना लता दीदींचा आवाज ऐकायला मिळेल. हे राम भजन त्यांनी रेकॉर्ड केलेल्या गाण्यांपैकी शेवटचे रेकॉर्डिंग असेल. मयुरेश  पै यांना बोलावून त्यांनी शेवटच्या दिवसांमध्ये पायावर नीट उभं राहता येत नसताही आपल्या आवजात राम भजन रेकॉर्ड केले आहे अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे. नक्की वाचा: Ram Lalla Pranpratishtha: अयोध्येमधील मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठाची तारीख जाहीर; सूर्य तिलकची तयारीही पूर्ण, घ्या जाणून .

दत्ता डावजेकरांनी लता मंगेशकर यांना संगीतक्षेत्रात पार्श्वगायनाची संधी दिली आणि बघता बघता त्यांनी सारं संगीतक्षेत्र व्यापलं. बॉलिवूड गाण्यांपासून भक्तीगीतं सारं काही त्यांच्या आवाजात रेकॉर्डेड आहे. त्याची भूरळही रसिकांवर आहे. पण आता राम मंदिराच्या उद्धाटनाच्या मंगल पर्वावर त्यांच्या आवजातील शेवटचं राम भजन ऐकण्यासाठी देखील त्यांचे रसिक आतुर आहेत.

6 फेब्रुवारी 2022 दिवशी लता मंगेशकर यांचे निधन झाले. कोविडची लागण आणि त्यामधून अन्य इंफेक्शनद्वारा त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.