लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये समाधानकारक सुधारणा; उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची डॉक्टरांची माहिती

लता मंगेशकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

Lata Mangeshkar (Photo Credits: Getty)

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) 11 नोव्हेंबर पासून मुंबईतील ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) दाखल आहेत. फुफ्फुसातील संसर्गामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आता लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून (ICU) बाहेर काढण्यात आल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तामधून समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून मंगेशकर कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली होती. लता मंगेशकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्यतेची चौकशी करण्यासाठी, रुग्णालयात घेतली लता मंगेशकर यांची भेट

लता मंगेशकर यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 90 वर्षीय लता मंगेशकर यांना न्युमोनियाचे निदान झाल्यानंतर हा त्रास जाणवत होता. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवर तर काही आठवडाभर लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते.

TOI शी बोलताना प्रतित समदानी या लता मंगेशकर यांच्यावर उपचार करनार्‍या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून हळूहळू सुधारत आहे. मागील आठवड्यात त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये समाधानकारक सुधारणा दिसल्यास आठवड्याभरात त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement