Kulkarni Chaukatla Deshpande First Look: सई ताम्हणकर उचलतेय एक धाडसी पाऊल
कायमच आऊट ऑफ द बॉक्स भूमिका स्वीकारून अभिनयाचा कस दाखवण्यात Sai Tamhankar हे नाव कायमच अग्रेसर राहिलं आहे. आणि आता Kulkarni Chaukatla Deshpande या आगामी चित्रपटातून सई येत्या २२ नोव्हेंबरला उचलतेय एक धाडसी पाऊल.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात ‘नाती’ या शब्दाला खूप वजन आहे आणि त्याहून जास्त वजनदार आहे ते म्हणजे नाती सांभाळण्याची जबाबदारी. पण नाती खरंच तितकी महत्त्वाची असतात? प्रत्येक नात्याची जबाबदारी सांभाळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं का? आयुष्याच्या वळणावर येणा-या वेगळ्या नात्यांचा प्रवास उलगडवणारा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा मराठी चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
तिला आख्खं आयुष्य बदलून टाकायचं होतं. तिने पेहराव बदलला, तिने घर बदललं, तिने नोकरी बदलली, तिने ऍटिट्युड बदलला, तिने नवरा बदलला, तिने मित्र बदलला, तिने तिचं जगणं बदललं पण तिचं जगणं बदललं का? भूमिका बदलत गेलेल्या भूमिकामागची भूमिका करणारी Sai Tamhankar येतेय तुमच्या भेटीला.
चित्रपटांची पन्नाशी गाठणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे नेहमीच आजपासच्या गोष्टींमधून वेगळा दृष्टिकोन मांडणारा सिनेमा मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मधून अनुभवयाला मिळेल.
नुकतेच या सिनेमाचे Poster Release झाले आहे आणि पोस्टरमध्ये दाखवल्यानुसार सई ताम्हणकर मुलगी, पत्नी, आई आणि प्रेयसी या अनेक नात्यांमध्ये दिसणार आहे.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाची निर्मिती स्मिता विनय गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित पोतदार आणि सीमा अलापे यांनी केली आहे. झपाट्याने बदलणा-या आजच्या काळात नात्यांचा अक्षांश रेखांशला छेद देणारा .‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपट 22 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)