Krishna Shroff Bikini Pics: टायगर श्रॉफची बहिणी कृष्णा श्रॉफचा बिकनीतील फोटो पाहून आई आयशा श्रॉफने 'अशी' केली कमेंट
Krishna Shroff (Photo Credit: Instagram)

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) आता 28 वर्षांची झाली आहे. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि चित्रपट निर्मात्या आयशा श्रॉफ (Ayesha Shroff) यांची मुलगी कृष्णा श्रॉफ ही तिच्या भावाप्रमाणेच फिटनेसची चाहती आहे. ती नेहमी तिच्य स्टाईलमुळे चर्चेत असते. यातच कृष्णा श्रॉफने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इन्टाग्रामवर एक धमाकेदार फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर आग लागली असून तिच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधूनही तिच्या फोटोवर कमेंट केल्या जात आहे. मात्र, कृष्णाच्या आईने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कृष्णाच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

कृष्णा तिचा 28वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने कृष्णाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काळ्या रंगाची बिकिनी परिधान करुन फोटो एक शेअर केला आहे. तसेच या फोटोला तिने ‘मी 28 वर्षांची झाले’असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या फोटोवर प्रतिक्रियेचा वर्षाव होत आहे. दरम्यान,‘माझ्या अतिशय सुंदर मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा… माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे’ अशी कमेंट आयशा श्रॉफ यांनी केली आहे. हे देखील वाचा- Sara Ali Khan Workout Video: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान चा एरियल योगा व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण; पहा व्हिडिओ

कृष्णा श्रॉफची इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णा श्रॉफ हे दोघेही त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत असतात. कृष्णा श्रॉफ नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तीने इन्टाग्रामवर आतापर्यंत 241 पोस्ट केल्या आहेत. तर, 7 लाख 46 हजारांहून अधिक युजर्सने तिला फॉलो केले आहे. तर, ती स्वत: 426 जणांना फॉलो करत आहे.