Kiran Mane Viral Post: किरण मानेंची 'ती' पोस्ट व्हायरल, पोस्ट वाचून चाहतेही झाले भावूक, सातारा आईसारखी माया........
किरण मानें यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. खरतर प्रत्येकांने वाचावी या उद्देशाने ही पोस्ट किरण माने यांनी लिहली आहे. आपल्या जन्मभूमी साताऱ्याच छान असं पोस्ट तयार करुन शेअर केलं आहे.
Kiran Mane Viral Post: मराठी मालिकासृष्टीतलं एक नाव जे नेहमीच चर्चेत असतं ते म्हणजे किरण माने. वेगवेगळ्या कारणांनी किरण माने ही चर्चेचे विषय ठरतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील भरपुर आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. वेगवेगळे पोस्ट आणि फोटो शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी इन्स्टाग्रामच्या अकांउटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. सद्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कंमेन्ट देखील केले आहे. आपल्या जन्मभुमी सातऱ्या बद्दल पोस्ट टाकली आहे.
लोकं म्हन्त्यात "सारखं शुटिंगसाठी मुंबई-सातारा-मुंबई.. कशाला यवढी दगदग करत असता? मुंबईत शिफ्ट व्हा की फॅमिली घेऊन."
खरंतर मुंबै लै आवडती. नाटका-सिनेमात रमनारी ! जगातलं हे एकमेव शहर असं आसंल, जिथं रोज, कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्यातरी नाटकाचा प्रयोग अस्तो. कुठं ना कुठं, कस्लं ना कस्लंतरी शुटिंग सुरू आस्तं. कस्लं भारीय हे !
पन सातारा म्हंजी काळजाचा तुकडा हाय आपल्या. गेली दहा वर्ष मी नाटक-सिनेमा सिरीयलनिमित्तानं हळूहळू मुंबैत बिझी होत गेलो. पन शुटिंग-नाटकाचं प्रयोग करून परत सातारला येताना लिंबखिंडीतनं सातार्याकडं बघितल्यावर जे वाटतं मला, ते शब्दांत नाय सांगू शकत..
u
...माझ्या घराशेजारी भक्कम पाय रोवून माझ्या पाठीशी उभा असलेला अजिंक्यतारा.. म्हैन्यातनं एकदातरी हाक मारून बोलवून घेनारं कास पठार.. आस्तीक असो नायतर नास्तिक, अस्सल सातारकर एकातरी श्रावनी सोमवारी यवतेश्वरला आनि दिवाळीत पयल्या अंघोळीला खिंडीतल्या गनपतीला जातोच.. कधीमधी सज्जनगडावर जाऊन तिथल्या महाप्रसादाची चव चाखतोच ! पावसाळ्यातल्या ठोसेघरपुढं स्काॅटलंड आन युरोप झक मारंल राजेहो !! कधी मन उदास झालं तर माहूलीला कृष्ना-वेन्नेच्या संगमावर जाऊन वहात्या पान्याकडं एकटक बघत बसायचं. मूड फ्रेश असला तर कन्हेर डॅमवर चक्कर मारायची... काय-काय सांगू !
(हेही वाचा- किरण माने या सोंगाड्यावर कारवाई)
कधी वरच्या रोडवरनं राजवाड्यावर जाऊन खालच्या रोडवर्न परत पोवई नाक्यावर आलं तर आख्खं सातारा भेटतं... दोस्तलोकं हाक मारत्यात "ऐ किरन्या भावा...लै मोट्टा ॲक्टर झालास.. आमाला इसारला न्हायस ना? ये की घरी रैवारी मटन खायाला."
बास. आजून काय पायजे? मुंबै बापासारखी असली तरी सातारा आईसारखी माया करतं माझ्यावर... आपल्या आईला सोडुन कधी कुनी जातं का?
म्हनूनच, मुंबैत काम करायला शंभर हत्तींचं बळ देनारा माझा सातारा आपन कधीच सोडनार नाय गड्या...
अभिनय क्षेत्रात किरण माने यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुलगी झाली हो या मालिकेत काम केलं होत. त्यानंतर ते एका वादाच्या भोवऱ्यात सापडले. मराठी बिगबॉस 4मध्ये ही दमदार ओळख निर्माण केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)