Kedarnath teaser : अंगावर शहारे आणणाऱ्या सारा खानच्या 'केदारनाथ'चा टीजर प्रदर्शित

अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सैफ अली खान कन्या सारा खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे

केदारनाथ (photo Credit: YouTube)

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या चित्रपटाची चर्चा प्रत्येकाच्या ओठी होती, अशा ‘केदारनाथ’चा टीजर नुकताच लॉंच करण्यात आला आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सैफ अली खान कन्या सारा खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. यामुळे या चित्रपटाचे महत्व आणखी वाढले आहे. सारा खानसोबत सुशांत सिंग राजपूत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे.

सारा अली खानला प्रेक्षक स्वीकारतील का हे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच ठरणार आहे. रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. केदारनाथ ही एक प्रेमकहाणी आहे. चारधामांपैकी एक केदारनाथची पार्श्वभूमी या चित्रपटाला लाभली आहे. टीजरमध्ये आपल्याला अंगावर काटा आणणारी महापुराची काही दृश्ये दिसतात. टीजरमध्ये लिहिले आहे, 'इस साल करेंगे सामना प्रकृति के क्रोध का और साथ होगा सिर्फ प्यार'.  2013 मध्ये उत्तराखंडमध्ये जो महापूर आला त्याचाही संदर्भ या प्रेमकथेला असणार आहे. 'केदारनाथ' चित्रपट येत्या 7 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif