Justin Bieber birthday: दारू आणि ड्रग्ज घेणाऱ्या 'जस्टिन बीबर'च्या आयुष्यातील काही वादग्रस्त घटना

गायक, गीतकार, संगीतकार म्हणून वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी जस्टिन बीबर अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला होता. जस्टिनचे आयुष्य हे फार वादग्रस्त ठरले आहे. कधी गर्लफ्रेंड्समुळे तर कधी पोलिसांनी अटक केल्यामुळे जस्टिन नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.

Justin Bieber (Photo Credits: Getty Images)

इंग्रजी संगीतामधील एक आघाडीचे आणि लोकप्रिय नाव म्हणजे पॉपस्टार जस्टिन बीबर (Justin Bieber). 1 मार्च 1994 साली जस्टीनचा जन्म झाला. ग्रॅमी अॅवॉर्ड विजेत्या या गायकाने आज संपूर्ण दुनियेला वेड लावले आहे. गायक, गीतकार, संगीतकार म्हणून वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी जस्टिन अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला होता. बीबरचे पहिले गाणे ‘वन टाइम’ (One Time) 2009 मध्ये रिलीझ झाले, या गाण्याचा समावेश कॅनडाच्या सर्वोत्कृष्ट दहा गाण्यांमध्ये केला गेला होता. जस्टिन हा पहिला असा कलाकार आहे ज्याची सात गाणी बिलबोर्ड हॉट 100 च्या यादीत समाविष्ट झाली होती. जस्टिनचे ‘बेबी’ (Baby)हे गाणे संपूर्ण जगात लोकप्रिय ठरले होते. आजही अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जस्टिनच्या नावावर आहेत.

फोर्ब्‍स मासिकानुसार 2016 साली जस्टिन बीबरची कमाई 5.6 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 358 कोटी होती. मासिकाच्या अंडर 30 मध्ये त्याला स्थान मिळाले होते. तर आता इतका मोठा कलाकार म्हटल्यावर त्याचे नखरेही तितकेच मोठे असणार. जस्टिनचे आयुष्य हे फार वादग्रस्त ठरले आहे. कधी गर्लफ्रेंड्समुळे तर कधी पोलिसांनी अटक केल्यामुळे जस्टिन नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण जस्टिनच्या आयुष्यातील काही वादग्रस्त गोष्टी पाहणार आहोत.

> फॅन्सवर थुंकणे -

जुलै 2013 मध्ये, जस्टिन बीबर त्याच्या हॉटेलच्या बाल्कनीच्या खाली उभे असलेल्या चाहत्यांवर थुंकला होता. जस्टिन जिथे जातो तिथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते, त्यावेळी अशीच गर्दी झाली होती. मात्र उन्मत्त जस्टिन चक्क आपल्या चाहत्यांवर थुंकला होता.

> अॅन फ्रँकवर विवादित विधान –

2013 मध्ये नेदरलँडमधील मैफिलीच्या आधी जस्टिनने आपल्या मित्रांसह 'द अॅन फ्रँक हाऊस'ला भेट दिली होती. तिथे त्याने 'गेस्ट बुक' मध्ये लिहिले - “Truly inspiring to be able to come here. Anne was a great girl. Hopefully, she would have been a belieber.”. जस्टिनच्या या वाक्यामुळे तो चांगलाच अडचणीत आला होता.

> शेजाऱ्याच्या घरावर अंडी फेकली –

2014 मध्ये, वयाच्या 20व्या वर्षी जस्टिनवर शेजाऱ्याच्या घरावर अंडी फेकण्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी जस्टिनच्या घरावर छापादेखील टाकला होता. (हेही वाचा: बॉलीवूडमधील काही विवादित kiss)

> पोलिसांनी केली होती अटक –

23 जानेवारी 2014 रोजी फ्लोरिडाच्या मियामी बीचवर दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आरोपाखाली  पोलिसांनी जस्टिनला अटक केली होती. तपासणीमध्ये जस्टिनने ड्रग्जही घेतल्याचे आढळले होते. त्यावेळी, जस्टिनकडे जो गाडी चालवण्याचा परवाना होता जो 6 महिन्यांपूर्वी एक्सपायर झाला होता. त्यानंतर जस्टिनला 2,500 डॉलरला दंड आकारण्यात आला होता.

> मुंबईमधील विवादित शो –

जस्टिनने मागच्या वर्षी पहिल्यांदाच मुंबईमध्ये आपला शो केला होता. या शोची प्रचंड जाहिरात केली गेली होती, त्याला तसा प्रतिसादही मिळाला होता. अनेकांनी लाखो रुपये खर्चून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 90 मिनिटांमध्ये जस्टिनने साधारण 20 गाणी सादर केली होती. मात्र जस्टिनने  त्यावेळी लिपसिंक केले होते असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. म्हणजे मागे गाणे वाजत होते, त्यावर जस्टिन फक्त आपले ओठ हलवत होता. या घटनेनंतर अनेकांनी सोशल मिडीयावर आपला राग व्यक्त केला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now