मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच Theatres मिळत नसल्याचं दुर्दैव; Prasad Oak झाला संतप्त
दर वर्षी सणावारी बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची रेलचेल असते. मोठ्या बजेटचे हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असतात. मराठी चित्रपटही कंबर कसून चांगल्या चांगल्या संहितेंसह सज्ज होत असतात. परंतु इतकी सगळी मेहनत करूनही चित्रपटांना प्रक्षकांपर्यंत पोचण्यासाठीच मेहनत करावी लागते.
मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच चित्रपटगृह मिळत नसल्याचा वाद आता पुन्हा उफाळून आला आहे. दर वर्षी सणावारी बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची रेलचेल असते. मोठ्या बजेटचे हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असतात. मराठी चित्रपटही कंबर कसून चांगल्या चांगल्या संहितेंसह सज्ज होत असतात. परंतु इतकी सगळी मेहनत करूनही चित्रपटांना प्रक्षकांपर्यंत पोचण्यासाठीच मेहनत करावी लागते. कारण सगळ्या थेटर्समध्ये हिंदी चित्रपटांचे शो लावले जातात. प्राईम टाइमला मराठी चित्रपट लागणं तर अगदी अशक्यच. या वर्षीही ह्याच वादाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. 'हिरकणी' (Hirkani) आणि 'ट्रिपल सीट' (Triple Seat) या दोन्ही चित्रपटांना 'हाऊसफुल्ल 4' (Housefull 4) मुळे मिळणं मुश्किल झालं आहे. याविरोधात चित्रपट दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) याने आवाज उठवला आहे.
प्रसाद ओक म्हणतो, 'शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. याच महाराष्ट्रात छत्रपतींच्या इतिहासातील एका महत्वपूर्ण घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटाला जर चित्रपटगृह मिळत नसतील तर ती खरोखरच दुर्दैवाची बाब आहे. दक्षिणेमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांना प्राधान्य मिळते. दाक्षिणात्य चित्रपटांसमोर हिंदी चित्रपटही तग धरू शकत नाहीत. मग महारष्ट्रातच मराठी चित्रपटाबाबत ही दुरावस्था का?'' (हेही वाचा. 'साहेबांच्या भाषेत जर तुम्हाला सांगितले तर जास्त पटेल...' अमेय खोपकर यांचा थिएटर मालकांना मनसे स्टाईल दणका)
मराठी चित्रपटांसोबत होत असलेला हा अन्याय हा बराच काळापासून ग्रासत असलेला प्रश्न आहे. 'कट्यार काळजात घुसली' आणि 'मुंबई पुणे मुंबई 3' च्या वेळी सुद्धा हाच त्रास मराठी चित्रपटांना सहन करावा लागला होता. कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीतेंव्हा सुद्धा या गोष्टींविरोधात पावलं उचलली होती.