Agri Youtuber Vinayak Mali: युट्युब स्टार विनायक माळी कसा बनला आगरी किंग? जाणून घ्या त्याच्याबद्दल काही खास गोष्टी

मात्र सोशल मीडिया पोस्टद्वारे तो चाहत्यांशी कनेक्टेड राहत आहेत. आगरी कॉमेडीने सर्वांना हसवणाऱ्या विनायक माळी बद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी:

Vinayak Mali (Photo Credits: Instagram)

लोकप्रिय युट्युब स्टार (Youtube Star) आणि आगरी कॉमेडियन (Agri Comedian) विनायक माळी (Vinayak Mali) याला कोरोना विषाणूंची लागण झाली आहे. याची माहिती स्वतः विनायक याने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. गेल्या 4-5 महिन्यांपासून कोविड-19 चे संकट देशावर आहे. कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान विनायक माळी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र सोशल मीडिया पोस्टद्वारे तो चाहत्यांशी कनेक्टेड राहत आहे. आगरी कॉमेडीने सर्वांना हसवणाऱ्या विनायक माळी बद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी:

मराठीत काही मोजकेच कॉमेडी युट्युब चॅनल आहेत. त्यापैकी विनायक माळी याचे चॅनल अत्यंत लोकप्रिय आहे. त्याच्या चॅनलला सध्या 1.8 मिलियन सब्सक्रायबर्स आहेत. अजून पर्यंत त्याने युट्युवर 56 कॉमेडी व्हिडिओज अपलोड केले असून त्याच्या बहुतांश व्हिडिओजना मिलियनमध्ये व्ह्युज आहेत. 'माझी बायको सिरीज सीजन 2' हा व्हिडिओ 70 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. विनायक याने आपले युट्युब चॅनेल मार्च 2017 मध्ये सुरु केले असून अवघ्या 3 वर्षात त्याला घवघवीत यश मिळाले आहे. आता त्याला 'आगरी किंग' म्हणूनही ओळखले जाते.

सुरुवातील विनायक माळी याने हिंदी भाषेत व्हिडिओज तयार केले होते. मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने त्याने मराठी- आपल्या आगरी भाषेत व्हिडिओज तयार करायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच त्याला प्रसिद्धी मिळाली.

 

View this post on Instagram

 

Teaser... watch full video on youtube channel vinayak mali https://youtu.be/F20LeXp06uE

A post shared by vinayak (@vinayakmali74_official) on

कोरोना संसर्गातून प्रकृती सुधारण्यासाठी येणाऱ्या शुभेच्छांसाठी त्याने चाहत्यांचे आभारही मानले. दरम्यान स्वतःच्या प्रकृतीची माहिती देताना विनायक माळी याने आपल्या चाहत्यांना महत्त्वपूर्ण संदेश दिला. पिझ्झा, बर्गर यांसारखे बाहेरील खाद्यपदार्थ खावू नका. केवळ घरी बनवलेले अन्नच खा. त्याचबरोबर त्याने लोकांना सातत्याने हात, वस्तू सॅनिटाईज करण्याचे आवाहन केले आहे. हा संदेश आपल्या चाहत्यांसह शेअर करत त्याने क्वारंटाईन सेंटरमधील स्टाफला सलाम केला आहे.