Who is Neelam Gill: नीलम गिल कोण आहे? भारतीय वंशाच्या मॉडेलला डेट करत आहे हॉलिवूड स्टार Leonardo DiCaprio's

अकादमी पुरस्कार विजेता अभिनेता देखील त्याच्या किलर्स ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कार्यक्रमात होता.

Leonardo DiCaprio and Neelam Gill (Photo Credits: Twitter)

Who is Neelam Gill: लिओनार्डो डी कॅप्रियो (Leonardo DiCaprio) चे डेटिंग लाइफ पुन्हा एकदा चर्चेत आहे. 48 वर्षीय अभिनेता 28 वर्षीय भारतीय वंशाच्या मॉडेल नीलम गिल (Neelam Gill) ला डेट करत असल्याची माहिती आहे. लिओनार्डो डी कॅप्रियो 30 मे रोजी लंडनमधील चिल्टर्न फायर हाऊसमध्ये नीलम गिलसोबत दिसला होता. पेज सिक्सने वृत्त दिले की, यावेळी अभिनेत्याची आई इर्मेलिन इंडेनबिर्केन देखील त्याच्यासोबत होती. स्वतःला ब्रिटीश पंजाबी मॉडेल म्हणून सांगणारी नीलम गिल गेल्या महिन्यात कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. अकादमी पुरस्कार विजेता अभिनेता देखील त्याच्या किलर्स ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कार्यक्रमात होता.

कोण आहे नीलम गिल?

नीलमने वयाच्या 14 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली आणि तिने फॅशन इंडस्ट्रीमध्ये एक मोठे नाव बनले. एका दशकापूर्वी, नीलम बर्बेरी मोहिमेत सहभागी होणारी पहिली भारतीय मॉडेल बनली. तिने वोग सारख्या प्रतिष्ठित फॅशन मासिकांसाठी शूट केलं आहे. नीलमने नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या उद्घाटनासाठीही मुंबईत हजेरी लावली. डायरच्या भारतातील पहिल्या शोसाठी तिने रॅम्प वॉकही केला आहे. (हेही वाचा - Avatar The Way Of Water: 'अवतार: द वे ऑफ वॉटर' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदीत होणार रिलीज)

 

View this post on Instagram

 

A post shared by NEELAM KAUR GILL (@neelamkg)

 

View this post on Instagram

 

A post shared by NEELAM KAUR GILL (@neelamkg)

नीलम गिलचे भारताशी नाते -

नीलम गिलचा जन्म 1995 मध्ये लंडनमध्ये झाला. तिच्या पालकांचा जन्म यूकेमध्ये झाला होता, तिचे आजी-आजोबा पंजाबमधील होते. नीलमने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ती लहान असताना तिचे पालक कसे वेगळे झाले. मॉडेलने शेअर केले की, तिचा तिच्या वडिलांशी कोणताही संवाद नाही. तिची आई आणि सावत्र वडिलांनी तिला सांभाळले.

 

View this post on Instagram

 

A post shared by NEELAM KAUR GILL (@neelamkg)

 

View this post on Instagram

 

A post shared by NEELAM KAUR GILL (@neelamkg)

 

View this post on Instagram

 

A post shared by NEELAM KAUR GILL (@neelamkg)

नीलम गिल तिच्या YouTube चॅनेलवर गुंडगिरी, नैराश्य आणि शरीराच्या आत्मविश्वासासोबत संघर्ष यासारख्या विषयांवर चर्चा करते. ती ऑनलाइन ट्रोल्सलाही संबोधित करते.