James Earl Jones Passes Away: ज्येष्ठ अभिनेते जेम्स अर्ल जोन्स यांचे वयाच्या 93 वर्षी निधन, न्युयॉर्क येथील राहत्या घरात घेतला अखेरचा श्वास
यांच्या निधनाची माहिती पसरताच, हॉलिवूनडमध्ये शोकांतिका पसरली आहे. जेम्स अर्लस जोन्स यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात कामे केली. द लायन किंग आणि डार्थ वडेर यांसारख्या चित्रपटात त्यांना आवाज दिला होता
James Earl Jones Passes Away at 93: ज्येष्ठ अभिनेते जेम्स अर्ल जोन्स (James Earl Jones) यांचे वयाचे ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. यांच्या निधनाची माहिती पसरताच, हॉलिवूडमध्ये शोकांतिका पसरली आहे. जेम्स अर्लस जोन्स यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात कामे केली. द लायन किंग आणि डार्थ वडेर यांसारख्या चित्रपटात त्यांना आवाज दिला होता. न्युयॉर्क येथील डचेस काऊंटी येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेम्स अर्ल जोन्स हे पडद्यावरील आणि रंगमंचावरील सर्वोत्तम अभिनेते आहे. 80 च्या दशकात चित्रपटसृष्टीत त्यांनी कामे केली. (हेही वाचा- साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा! चित्रपट दिग्दर्शक दिल्ली बाबू यांचे निधन; चेन्नईत होणार अंत्यसंस्कार)
डार्थ वडर आणि मुफासा यांसारख्या अनेक अविस्मरणीय पात्रांना आपला आवाज देणारे दिग्गज अभिनेते होते. त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली. जेम्स अर्ल जोन्स यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला.
जेम्स अर्ल जोन्स हा 1965 मध्ये 'ॲज द वर्ल्ड टर्न्स' द्वारे टीव्हीवर आपली छाप पाडणारा पहिला आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्यांपैकी एक होता. गेल्या काही वर्षांत, त्यांनी दोन एमी, एक गोल्डन ग्लोब, दोन टोनी पुरस्कार, एक ग्रॅमी, नॅशनल मेडल ऑफ आर्ट्स आणि केनेडी सेंटर ऑनर्स यासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.