Smyrna Plane Crash: टार्जन अभिनेता Joe Lara यांचे विमान अपघातात निधन, पत्नी Gwen Lara यांच्यासह इतर पाचजणांचाही मृत्यू

त्यांनी मॉडेलिंगपासून आपले करिअर सुरु केले. पुढे त्यांनी टार्जन मालिकेत महत्त्वाची भूमीका निभावली. 1996 ते 1997 दरम्यान प्रसिद्ध झालेल्या टार्जन मालिकेच्या 22 भागांमध्ये Joe Lara यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले.

Tarzan actor Joe Lara | (Photo Credits: Instagram)

जगप्रसिद्ध अभिनेता विल्यम जोसेफ लारा (Joe Lara) यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. लारा यांच्या विमानाला शनिवारी (28 मे) अपघात झाला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी ग्वेन लारा आणि इतरही काही लोक विमानात होते. यापैकी पत्नी ग्वेन लारा (Joe Lara) आणि त्यांच्यासह पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. सांगितले जात आहे की, जोसेफ लारा (Tarzan Actor Joe Lara) यांच्यासह एकूण सहा लोक एका छोट्याशा जेट विमानातून प्रवास करत होते. हे विमान Nashville येथील Tennesse झऱ्यात कोसळले. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. 1990 मध्ये आलेल्या टार्जन टीव्ही मालिकेत जोसेफ लारा यांनी 'टार्झन' ही प्रमुख व्यक्तीरेखा साकारली होती.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, Joe Lara यांच्यासह इतरही 6 लोकांचे मृतदेह पोलीस शोधत आहेत. रदरफोर्ट काऊंटी फायर रेस्क्यू पथकाचे प्रमुख जॉन इंगल यांनी सांगितले की, Smyrna जवळ पर्सी प्रीस्ट तलावात (झरा) शोधमोहीम सुरु आहे. तलावाशेजारी दूर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष आणि मलबा आढळून आला आहे. त्याचाही तपास सुरु आहे. या विमान अपघातात मृत्यू झालेल्या मृतांची ओळख शनिवारी जाहीर करण्यात आली. यात ब्रॉंडन हाना, ग्वेन एस लारा, विल्यम जे लारा, डेविड एल मार्ट‍िन, जेनिफर जे मार्ट‍िन, जेस्स‍िका वाल्टर्स आणि जोनाथन वॉल्टर्स यांचा समावेश आहे. सर्वजण Tennessee येथून होते.

Joe Lara यांचा जन्म सॅन डिएगो येथे 2 ऑक्टोबर 1962 मध्ये झाला. त्यांनी मॉडेलिंगपासून आपले करिअर सुरु केले. पुढे त्यांनी टार्जन मालिकेत महत्त्वाची भूमीका निभावली. 1996 ते 1997 दरम्यान प्रसिद्ध झालेल्या टार्जन मालिकेच्या 22 भागांमध्ये Joe Lara यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले. त्यांनी ग्वेन यांच्याशी विवाह केला होता. त्यांना दोन मुली आहेत. आपल्या परिवारासोबत ते ब्रेंटवूड येथे राहात होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Fimela.com (@fimeladotcom)

टार्जन ही एक अमेरिकन ड्रामा सीरीज होती. या मालिकचा पहिला भाग 1996 ते 1997 दरम्यान ऑन-एयर आला होता. या मालिकेत टार्जनची मानवीय सभ्यता, मुल्ये आणि विवाह अशा काही गोष्टींना दाखविण्यात आले होते. या मालिकेचे शूटींग दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी रिजॉर्ट येथे झाले होते.