अँजेलीना जोली सारखे बनण्यासाठी केल्या अनेक शस्त्रक्रिया; चेहरा विद्रूप झाल्यावर सरकारने केली Insta-Star ला अटक (Photos)
या तरुणीला हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोलीसारखे दिसायचे होते. त्यामुळे तिने स्वतःच्या चेहऱ्यावर अनेक शस्त्रक्रिया करून घेतल्या
इराणवर महिलाविरोधी असल्याचा डाग लागला होता, कितीही प्रयत्न केला तरी हा धब्बा काही पुसला जात नाही. 'ब्लू गर्ल'च्या मृत्यूमुळे यापूर्वीच जगभरात इराणची विश्वासार्हता कमी झाली आहे, आता इराणच्या आणखी एका निर्णयाने हा देश महिलाविरोधी देश असल्याचा आरोप केला जात आहे. एका इराणी इन्स्टाग्राम स्टारने तिचे काही विद्रूप आणि भितीदायक फोटो पोस्ट केले आहेत. या तरुणीला हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोलीसारखे दिसायचे होते. त्यामुळे तिने स्वतःच्या चेहऱ्यावर अनेक शस्त्रक्रिया करून घेतल्या, मात्र तिचा हा प्रयोग पूर्णतः फसला. सहर तबार (Sahar Tabar) असे या तरुणीचे नाव असून इराण सरकारने तिला अटक केली आहे.
वृत्तसंस्था तस्निमचा हवाला देत, ‘द नॅशनल’ च्या अहवालात सहार तबारला 'सांस्कृतिक गुन्हा, सामाजिक आणि नैतिक भ्रष्टाचार' च्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. एंजेलिना जोलीसारखे बनण्यासाठी सहारने कॉस्मेटिक शस्त्रक्रियेद्वारे तिचा चेहरा बदलला आणि तिची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राहिली. यामुळे तिच्यावर निंदनीय कृत्य करणे, हिंसा करण्यास प्रवृत्त करणे, चुकीच्या पद्धतीने पैसे कमावणे आणि तरुणांना भ्रष्टाचारासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. (हेही वाचा: तब्बल 221 पुरुषांना डेट केल्यानंतर सुपर मॉडेलने केले चक्क कुत्र्याशी लग्न; टीव्ही शोमध्ये प्रसारित झाला लग्न सोहळा (Video)
दरम्यान, इराणमध्ये सामाजिक व्यासपीठ म्हणून फक्त इन्स्टाग्रामलाच परवानगी आहे. फेसबुक आणि ट्विटर सारख्या अनेक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येथे बंदी आहे. गेल्या वर्षी प्लास्टिक सर्जरीनंतर सहारने तिचे बरेच फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर ती बरीच लोकप्रिय झाली होती. यामुळे इराणच्या अस्मितेला धक्का पोहचला आणि आता तिला अटक करण्यात आली आहे.