Oscar Awards 2025: ऑस्कर 2025 ची टाइमलाइन आली समोर; पुढील वर्षी 'या' दिवशी होणार अकादमी अवॉर्ड्स, जाणून घ्या तुम्ही भारतात कधी पाहू शकाल थेट प्रक्षेपण

आता अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस, या पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या संस्थेने 2025 मध्ये होणाऱ्या 97 व्या अकादमी पुरस्कारांची टाइमलाइन प्रसिद्ध केली आहे.

Oscar Awards (PC - Pixabay)

Oscar Awards 2025: ऑस्कर पुरस्कार हा चित्रपट जगतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. चित्रपट निर्मात्यांसोबत कलाकारही त्याची वाट पाहत असतात. दरवर्षी, जगभरातील शेकडो चित्रपट ऑस्कर पुरस्कारांमध्ये नामांकनासाठी स्पर्धा करतात, परंतु काही निवडक चित्रपट आणि कलाकारांनाच पुरस्कार जिंकण्याची संधी मिळते. आता अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस, या पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या संस्थेने 2025 मध्ये होणाऱ्या 97 व्या अकादमी पुरस्कारांची टाइमलाइन प्रसिद्ध केली आहे.

अकादमीने दिलेल्या माहितीनुसार, 2025 मधील ऑस्कर पुरस्कार सोहळा 2 मार्च (रविवार) रोजी लॉस एंजेलिस येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे. अमेरिकेत त्याचे थेट प्रक्षेपण एबीसी वाहिनीवर होणार आहे. ऑस्कर पुरस्कार दरवर्षी 23 श्रेणींमध्ये दिले जातात. गेल्या वर्षी, अकादमीने कास्टिंगसाठी नवीन श्रेणी जोडण्याची घोषणा केली होती. मात्र ही श्रेणी 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये प्रभावी होईल आणि 2025 मध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट त्यासाठी पात्र असतील.

ऑस्कर पुरस्कारांची शॉर्ट लिस्ट 17 डिसेंबरला जाहीर होणार आहे. यामध्ये सहभागी चित्रपटांचा पात्रता कालावधी 31 डिसेंबर रोजी संपेल, म्हणजे त्यानंतर प्रदर्शित होणारे चित्रपट या प्रक्रियेत समाविष्ट होणार नाहीत. नामांकनांसाठी मतदान 9 जानेवारी 2025 रोजी सुरू होईल आणि 12 जानेवारीपर्यंत चालेल. 97 व्या अकादमी पुरस्कारांसाठी नामांकने 17 जानेवारी 2025 रोजी जाहीर केली जातील. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2025 रोजी ऑस्कर नामांकन मिळालेले चित्रपट निर्माते आणि कलाकारांसाठी स्नेहभोजन होईल. अखेर 2 मार्च 2025 रोजी ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली जाईल. (हेही वाचा: Titanic Props Auction: टायटॅनिक चित्रपटामधील प्रॉप्सचा झाला लिलाव; रोझचा जीव वाचवणाऱ्या फळीची कोट्यावधी रुपयांना विक्री)

 

View this post on Instagram

 

A post shared by The Academy (@theacademy)

भारतामध्ये तुम्ही ते 3 मार्च रोजी पहाटे 4 ते 4:30 या वेळेत या पुरस्कारांचे थेट पाहू शकाल. दरम्यान, ऑस्कर 2024 मध्ये ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. 'ओपेनहायमर' चित्रपटाला 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. किलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. रॉबर्ट डाउनी ज्युनियरला त्याच्या सहाय्यक भूमिकेसाठी ऑस्कर मिळाला. हा त्याचा पहिला ऑस्कर होता. 'पूअर थिंग्ज'च्या एम्मा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif