Justin Bieber India Show: दिल्लीत 18 ऑक्टोबर रोजी परफॉर्म करणार जस्टिन बीबर; जाणून कुठे बुक कराल तिकिटे व दर

31 जुलै रोजी, जस्टिन बीबर प्रथम इटलीतील लुका समर फेस्टिव्हलमध्ये त्याच्या वर्ल्ड टूरची सुरुवात करेल. जस्टिनचे चाहते जास्त आनंदी आहेत कारण तो पाच वर्षांनी भारतात परफॉर्म करताना दिसणार आहे.

Justin Bieber (Photo Credits: Instagram)

जस्टिन बीबरच्या (Justin Bieber) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जस्टिनच्या अर्धांगवायूमुळे रद्द झालेली बहुप्रतीक्षित वर्ल्ड टूर पुन्हा सुरू होणार आहे. जस्टिन बीबरने नुकतेच त्याच्या वर्ल्ड टूरची घोषणा केली आहे. या वर्ल्ड टूरच्या निमित्ताने जस्टिन बीबर भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी भारतातही येणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजता नवी दिल्लीत गायक परफॉर्म करणार आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर तुम्ही हा शो पाहू शकता. त्याच्या कॉन्सर्टचे तिकीट 4000 रुपयांपासून सुरू होणार आहे. सर्वात महागडे तिकीट 37,500 रुपयांचे आहे.

मे मध्ये, जस्टिन बीबरने त्याच्या ‘जस्टिस’ अल्बमची जाहिरात करण्यासाठी वर्ल्ड टूरची घोषणा केली होती. 31 जुलै रोजी, जस्टिन बीबर प्रथम इटलीतील लुका समर फेस्टिव्हलमध्ये त्याच्या वर्ल्ड टूरची सुरुवात करेल. जस्टिनचे चाहते जास्त आनंदी आहेत कारण तो पाच वर्षांनी भारतात परफॉर्म करताना दिसणार आहे. तो शेवटचा 2017 मध्ये भारतातील एका कार्यक्रमाचा भाग बनला होता, तेव्हापासून भारतीय चाहते त्याच्या कॉन्सर्टची वाट पाहत होते आणि आता त्याची प्रतीक्षा संपणार आहे.

जस्टिनचे चाहते बुक माय शो (BookMyShow) वर या शोची तिकिटे बुक करू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार, जस्टिन बीबर भारतामधील या कॉन्सर्टमध्ये सुमारे 30 मिनिटे परफॉर्म करणार आहे. जस्टिनच्या वर्ल्ड टूरमध्ये केवळ भारत आणि इटलीच नाही तर दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचाही समावेश असेल. जगाचा दौरा संपवून जस्टिन 2023 मध्ये मायदेशी परतणार आहे. (हेही वाचा: Justin Bieber ला Ramsay Hunt Syndrome चे निदान, जाणून घ्या या आजाराविषयी अधिक)

दरम्यान, दरम्यान, जस्टिन बीबर 2017 मध्ये भारतात आला तेव्हा तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. लोकांनी भरमसाठ पैसे देऊन त्याच्या शोची तिकिटे खरेदी केली होती. मात्र कॉन्सर्टमध्ये जस्टिन बीबरने गाणे गायले नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्याने फक्त लिपसिंक केले होते, ज्यानंतर लोकांनी त्याची खिल्ली उडवली.