हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे वीनस्टीन याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध; अभिनेत्रीला कामाच्या बदल्यात दिली होती Threesome ची ऑफर
हॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता हार्वे वीनस्टीन (Harvey Weinstein) याच्या विरुद्ध अभिनेत्री डॉन डनिंग (Dawn Dunning) हिने लावलेल्या लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे
हॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता हार्वे वीनस्टीन (Harvey Weinstein) याच्या विरुद्ध अभिनेत्री डॉन डनिंग (Dawn Dunning) हिने लावलेल्या लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे, अमेरिकन मीडियातील वृत्तांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली गेली आहे. हार्वे याने अभिनेत्री डॉन डॅनींग हिला तीन मोठ्या सिनेमाची ऑफर देताना चक्क आपल्यासोबत थ्रीसम (Threesome) करण्यास सांगितले होते असा आरोप होता. याबाबत मागील काही दिवसांपासून तपास आणि चौकशी सुरु होती ज्यावर आता निकाल समोर येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, डॉन डनिंग यांच्या जबाबात, हार्वे वीनस्टीनने तो आणि त्याचा सहाय्यक असा एकत्र थ्रीसम करण्याच्या मोबादल्यात तीन सिनेमांमध्ये काम देण्याची ऑफर दिली असल्याचे सांगितले गेले होते. एवढंच नाही तर हा प्रस्ताव समोर ठेवतानाही वीनस्टीनने आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केल्याचे डाँनिंग यांचे म्हणणे होते. यावर सुरुवातीला डनिंग यांना वीनस्टीन मस्करी करत असल्याचं वाटलं. मात्र प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी वीनस्टीन ला कठोर शब्दात सुनावले ज्यावर वीनस्टीनने तू हॉलिवूडमध्ये कधीही यशस्वी अभिनेत्री होऊ शकत नाहीत असं उत्तर दिले होते.
ANI ट्वीट
दरम्यान, आजवर वीनस्टीनवर हॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींसह 100हून जास्त महिलांचे लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत . हार्वे वीनस्टीन हा हॉलिवूडमधील नावाजलेला निर्माता आहे. त्याच्या प्रोडक्शनमध्ये तयार करण्यात आलेल्या 81 सिनेमांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.