Harry Potter TV Series: एचबीओच्या नव्या हॅरी पॉटर मालिकेत पार्वती पाटीलच्या भूमिकेसाठी इटालियन अभिनेत्री Alessia Leoni ची निवड; चाहत्यांचा रोष
पार्वती पाटील हे हॉगवर्ट्समधील ग्रिफिंडोर हाऊसमधील एकमेव भारतीय पात्र आहे आणि तिच्या भूमिकेसाठी भारतीय अभिनेत्रीची निवड व्हावी, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र यासाठी इटलीच्या अभिनेत्रीची निवडा झाल्याने, हॉलिवूडमधील सांस्कृतिक प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे.
जे. के. रोलिंग (J.K. Rowling) यांच्या हॅरी पॉटर (Harry Potter) पुस्तकांवर आधारित एचबीओच्या आगामी टेलिव्हिजन मालिकेतील, पर्वती पाटील या भारतीय वंशाच्या पात्राच्या भूमिकेसाठी इटालियन अभिनेत्री अलेसिया लियोनी (Alessia Leoni) हिची निवड करण्यात आली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नुकतेच एचबीओने मालिकेतील अनेक नव्या कलाकारांची घोषणा केली, ज्यामध्ये अलेसिया लियोनीची पार्वती पाटीलच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर सोशल मीडियावर, विशेषतः भारतीय आणि दक्षिण आशियाई चाहत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या, आणि एचबीओवर भारतीय प्रतिनिधित्व नाकारल्याचा आरोप केला.
पार्वती पाटील हे हॉगवर्ट्समधील ग्रिफिंडोर हाऊसमधील एकमेव भारतीय पात्र आहे आणि तिच्या भूमिकेसाठी भारतीय अभिनेत्रीची निवड व्हावी, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र यासाठी इटलीच्या अभिनेत्रीची निवडा झाल्याने, हॉलिवूडमधील सांस्कृतिक प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे.
Harry Potter TV Series:
एचबीओची ही नवीन हॅरी पॉटर मालिका जे. के. रोलिंग यांच्या सात पुस्तकांवर आधारित आहे आणि प्रत्येक हंगामात एका पुस्तकाची कथा सविस्तरपणे सांगितली जाईल. ही मालिका 2026 किंवा 2027 मध्ये प्रीमियर होण्याची शक्यता आहे आणि ती एचबीओ मॅक्सवर प्रसारित होईल. मालिकेची निर्मिती फ्रान्सेस्का गार्डिनर यांनी केली असून, मार्क मायलॉड दिग्दर्शन करत आहेत. यापूर्वी डोमिनिक मॅक्लॉफ्लिन (हॅरी पॉटर), अरबेला स्टॅंटन (हर्मायनी ग्रेंजर), आणि अलास्टर स्टाउट (रॉन वीजली) यांसारख्या नव्या कलाकारांच्या निवडीची घोषणा झाली होती. (हेही वाचा: Michael Jackson Movie Release Date: मायकल जॅक्सन याच्यावरील बायोपिकचा कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या नवी अपडेट)
नुकतेच एचबीओने आणखी नऊ कलाकारांच्या नावांची घोषणा केली, ज्यामध्ये कॅथरिन पार्किन्सन (मॉली वीजली), लॉक्स प्रॅट (ड्रॅको मालफॉय), जॉनी फ्लिन (लुसियस मालफॉय), लिओ अर्ली (सीमस फिनिगन), सिएना मूसाह (लॅव्हेंडर ब्राउन), बेल पॉवली (पेटुनिया डर्स्ली), डॅनियल रिग्बी (व्हर्नन डर्स्ली), आणि बर्टी कार्व्हेल (कॉर्नेलियस फज) यांचा समावेश आहे. मात्र, अलेसिया लियोनीची पार्वती पाटीलच्या भूमिकेसाठी निवड ही सर्वात जास्त वादग्रस्त ठरली. या आधीच्या चित्रपट सिरीजमध्ये ही भूमिका शेफाली चौधरी हिने केली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)