IPL Auction 2025 Live

Harry Potter Return to Hogwarts: 1 जानेवारीसाठी वा सज्ज, साजरे होत आहे हॅरी पॉटरचे रीयुनियन; भारतामध्ये 'या' ठिकाणी पाहू शकाल हा खास कार्यक्रम (Watch Promo)

यामध्ये तीन लीड्स- डॅनियल रॅडक्लिफ, रुपर्ट ग्रिंट आणि एम्मा वॉटसन यांच्यासह चित्रपटातील सर्व महत्वाचे कलाकार तसेच पहिल्या दोन हॅरी पॉटर चित्रपटांचे दिग्दर्शक ख्रिस कोलंबस हे देखील सामील होणार आहेत

Harry Potter (File Image)

‘हॅरी पॉटर’ (Harry Potter) या नावाशी अनेकांच्या कितीतरी आठवणी जोडल्या गेल्या आहेत. आधी पुस्तके आणि नंतर त्यावर बेतलेल्या चित्रपटांनी जगात धुमाकूळ घातला होता. 2001 मध्ये हॅरी पॉटर सिरीजमधील पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी कल्पनाही नव्हती ही सिरीज इतिहास घडवणार आहे. आज तब्बल 20 वर्षानंतरही हॅरी पॉटरची जादू काही कमी झाली नाही. आता सुपर यशस्वी फिल्म फ्रँचायझी हॅरी पॉटर या वर्षी आपल्या पहिल्या चित्रपटाच्या रिलीजचा 20 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

'हॅरी पॉटर अँड द सॉर्सरर्स स्टोन' 16 नोव्हेंबर 2001 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता चित्रपटाचे निर्माते वॉर्नर ब्रदर्सने या सुपरहिट मालिकेच्या 20 वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अनेक कार्यक्रम आणि विशेष कंटेंटची योजना आखली आहे. हॅरी पॉटर सिरीज चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार फ्रँचायझीची 20 वर्षे साजरी करण्यासाठी एकत्र जमणार आहेत. यावेळी एक खास सेलिब्रेशन होणार असून, या खास उत्सवाला हॅरी पॉटर रिटर्न टू हॉगवर्ट्स (Harry Potter Return to Hogwarts) असे नाव देण्यात आले आहे. HBO Max वर हे सेलिब्रेशन प्रदर्शित होणार आहे.

हॉगवर्ट्सच्या ग्रेट हॉलमध्ये सर्व कलाकारांचे रीयुनियन होणार आहे. यामध्ये तीन लीड्स- डॅनियल रॅडक्लिफ, रुपर्ट ग्रिंट आणि एम्मा वॉटसन यांच्यासह चित्रपटातील सर्व महत्वाचे कलाकार तसेच पहिल्या दोन हॅरी पॉटर चित्रपटांचे दिग्दर्शक ख्रिस कोलंबस हे देखील सामील होणार आहेत. गप्पा, गोष्टी, आठवणी, मेकिंग प्रोसेस असा हा कार्यक्रम असणार आहे. (हेही वाचा: लोकप्रिय हॉलीवूड अभिनेता Paul Rudd ठरला यंदाचा जगातील सर्वात 'सेक्सी पुरुष'; Marvel च्या अनेक चित्रपटांमध्ये साकारली आहे भूमिका)

या खास सेलिब्रेशनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतात Amazon Prime Video वर 1 जानेवारी रोजी हा एपिसोड प्रदर्शित होईल. स्ट्रीमरने मंगळवारी याची घोषणा केली. मूळ HBO Max असलेला हा शो प्राइम व्हिडिओवर दुपारी 2:30 वाजता देशभरातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. दरम्यान, हॅरी पॉटर सिरीजमध्ये एकूण 8 चित्रपट असून, 2001–2011 या कालावधीमध्ये ते प्रदर्शित झाले होते.