Grammy Award 2023: भारतीय संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा जिंकला ग्रॅमी पुरस्कार; सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

कौतुकास्पद म्हणजे रिकी केज यांनी यांनी आजवरच्या आपल्या कारकीर्दीत जिंकलेलेला हा तिसरा ग्रॅमी पुरस्कार (Ricky Kej won the Grammy Award 2023) आहे. केज यांनी यंदाचा पुरस्कार भारताला अर्पण केला आहे.

Ricky Kej | (Photo Credit - Twitter)

बंगळरु येथील संगीतकार आणि निर्माता रिकी केज (Ricky Kej) यांनी ग्रॅमी पुरस्कार 2023 ( Grammy Award) जिंकला आहे. कौतुकास्पद म्हणजे रिकी केज यांनी यांनी आजवरच्या आपल्या कारकीर्दीत जिंकलेलेला हा तिसरा ग्रॅमी पुरस्कार (Ricky Kej won the Grammy Award 2023) आहे. केज यांनी यंदाचा पुरस्कार भारताला अर्पण केला आहे. 'डिव्हाईन टाइड्स' (Divine Tides) अल्बमसाठी केज यांनी ग्रॅमी जिंकला. या अल्बमला सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम श्रेणीमध्ये नामांकन मिळाले.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील एरिना येथे Crypto.com वर झालेल्या थेट समारंभात त्याच्या विजयाची घोषणा करण्यात आली. ट्रॉफी जिंकल्यानंतर केजने ट्विटरवर आनंद व्यक्त केला. आपल्या ट्विटर पोस्टमध्ये त्याने लिहीले, "आत्ताच मी तिसरा ग्रॅमी पुरस्कार जिंकला. मी अत्यंत कृतज्ञ, अवाक! झालो. मी हा पुरस्कार भारताला समर्पित करतो. @copelandmusic. हर्बर्ट वॉल्ट एरिक शिलिंग व्हॅनिल वेगास लोनी पार्क." (हेही वाचा, Oscars 2023 साठी पाच भारतीय सिनेमांचं नामांकन, The Kashmir Files, Kantara, RRR, Gangubai Kathiawadi आणि Chhello Show ची ऑस्करकडून निवड)

रिकी केज याच्या 'डिव्हाईन टाइड्स' अल्बममध्ये जगभरातील कलाकार आहेत. 'डिव्हाईन टाइड्स ही एक जगाच्या नैसर्गिक भव्यतेला श्रद्धांजली आहे. समीक्षकांनी कौतुक केलेल्या या अल्बममध्येक एकूण नऊ गाणी आणि आठ म्युझिक व्हिडिओ आहेत. जे संपूर्ण भारतामध्ये म्हणजेच हिमालयाच्या अत्युत्तम सौंदर्यापासून ते स्पेनच्या बर्फाळ जंगलांपर्यंत आणि जगभरातील अनेक भूप्रदेशावर चित्रित केले गेले आहेत. दरम्यान, केजचा कोपलँड सोबतची संयुक्त कलाकृती होती. 2022 मध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बमसाठीही एक ग्रॅमी जिंकला होता. संगीतकाराने त्याच्या 2015 अल्बम 'विंड्स ऑफ संसारा'साठी देखील ग्रॅमी जिंकला आहे. त्यामुळे यंदा जिंकलेला ग्रॅमी हा केजच्या आयुष्यातील तिसरा ग्रॅमी आहे.

ट्विट

दरम्यान, वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रिकी हा भारतातील सर्वात तरुण ग्रॅमी पुरस्कार विजेता आणि असे करणारा केवळ चौथा भारतीय आहे. जागतिक पातळीवर याबाबत विचार करता स्टीवर्ट कोपलँड, पाच वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते अमेरिकन संगीतकार आणि निर्माता ठरला आहे. स्टीवर्ट कोपलँड, हा 'द पोलिस' या ब्रिटीश रॉक बँडचा संस्थापक आणि ड्रमर आहे ज्याने आतापर्यंत जगभरात 75 दशलक्ष अल्बम विकले आहेत.