Coronavirus: ‘गेम ऑफ थ्रोन्स’ अभिनेता क्रिस्तोफर हिवजू याला कोरोना व्हायरसची लागण; इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून दिली माहिती
तसेच अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या जाळ्यात अनेक दिग्गज कलाकारही अडकले आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय वेब सीरिजचा अभिनेता क्रिस्तोफर हिवजू (Kristofer Hivju) यालादेखील कोरोनाची लागण झाली आहे. क्रिस्तोफर याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
Coronavirus: कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याने जगभरात सुमारे 6 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या जाळ्यात अनेक दिग्गज कलाकारही अडकले आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (Game of Thrones) या लोकप्रिय वेब सीरिजचा अभिनेता क्रिस्तोफर हिवजू (Kristofer Hivju) यालादेखील कोरोनाची लागण झाली आहे. क्रिस्तोफर याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
क्रिस्तोफरने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सांगितलंय. या पोस्टमध्ये क्रिस्तोफरने म्हटलं आहे की, ‘मी कोरोनाची चाचणी केली आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांचं घरात विलगीकरण केलं आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. मला केवळ सर्दी झाली आहे. कोरोना विषाणू सर्वांसाठी घातक आहे. त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्या,' असं आवाहनही क्रिस्तोफरने केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: 'जेम्स बाँड' फेम अभिनेत्री ओल्गा कुरिलेंको हिला कोरोना व्हायरसची लागण; इन्स्टाग्रामवर दिली माहिती)
क्रिस्तोफर हिवजू याने ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये टॉर्मंड जाएंट्सबेनची भूमिका साकारली होती. मागील आठवड्यामध्ये 'जेम्स बाँड' फेम (James Bond) अभिनेत्री ओल्गा कुरिलेंको (Olga Kurylenko) हिला कोरोनाची लागण झाली आहे. कुरिलेंको यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली होती. तसेच सुप्रसिद्ध आणि ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. याशिवाय कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची पत्नी सोफी यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.