प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता Tom Hanks आणि पत्नी Rita Wilson यांना कोरोना विषाणूची लागण

आज विषाणूमुळे लोग दिवसेंदिवस मृत्यू पडत आहेत, तर अनेक ठिकाणी अनेक सेवा ठप्प झाल्या आहेत. डब्ल्यूएचओने (WHO) नुकतेच त्याला एक साथीची रोग जाहीर केला आहे

टॉम हॅन्क्स आणि पत्नी रीटा (Photo Credits: Twitter/Instagram)

सध्या कोरोनाव्हायरसने फैलाव जगातील बर्‍याच देशांमध्येझाला आहे. आज विषाणूमुळे लोग दिवसेंदिवस मृत्यू पडत आहेत, तर अनेक ठिकाणी अनेक सेवा ठप्प झाल्या आहेत. डब्ल्यूएचओने (WHO) नुकतेच त्याला एक साथीची रोग जाहीर केला आहे. प्रत्येक विमानतळावर प्रवाशांची तपासणी चालू आहे. शासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. मात्र मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेऊनही हा विषाणू बळावत आहे. आता हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम हॅन्क्स (Tom Hanks) आणि त्याची पत्नी रीटा (Rita Wilson) यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः टॉमने सोशल मिडीयावर ही माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये टॉम लिहितो, ‘मी रिटा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहोत. आम्हाला थकवा जाणवत होता, सर्दी झाली, त्यानंतर अंगदुखीही सुरु झाली. जणू काही सर्दी झाल्याने आणि शरीरावर हलक्या वेदना देखील झाल्या. रिटाचीही सर्दी कमी जास्त होत होती. सध्याची जगभरातील परिस्थिती पाहता आम्ही दोघांनीही कोरोना विषाणूची चाचणी केली. ही चाचणी सकारात्मक आली आहे. त्यानंतर आता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काही प्रोटोकॉल आहेत ज्याचे पालन करावे लागेल. सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षा विभागाच्या अंतर्गत, आम्ही विविध चाचण्या, परीक्षण व आयसोलेशनसाठी तयार आहोत.’

(हेही वाचा: ब्रिटनच्या आरोग्यमंत्री नदीन डॉरिस यांना कोरोना व्हायरसची लागण; देशात कोरोनाचे एकूण 373 रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू)

वेळी टॉमने आपल्या चाहत्यांना सावधगिरी बाळगण्याच्या आणि काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच आपल्या तब्येतीबाबत आपण अपडेट्स देत राहू असेही त्याने सांगितले आहे. सध्या टॉम एका चित्रपटाच्या शुटींगसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. या चित्रपटात हॅन्क्ससोबत रुफुस सेवेल, ऑस्टिन बटलर, मॅगी गेलेनहॉल आणि ऑलिव्हिया डी जॉंज यांच्याही भूमिका आहेत. वॉर्नर ब्रॉसने सांगितले की, टॉम थेट कोणाच्या संपर्कात आला होता हे पाहण्यासाठी ते ऑस्ट्रेलियन आरोग्य एजन्सीच्या संपर्कात आहेत. सध्या लाल सिंह चड्ढा नावाने, टॉमच्या फॉरेस्ट गंप चित्रपटाचा हिंदी रिमेक बनत आहे, ज्यात आमिर खान मुख्य भूमिका साकारत आहे.