एकता कपूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, सीरिजचे पोस्टर चोरी केल्याचा आरोप
प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर हिची आगामी वेब सीरिज सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
बॉलिवूड मध्ये गेल्या काही काळापासून एखाद्या व्यक्तीची प्रेरणा घेऊन त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवले जात आहेत. अशाच बहुतांश कथा वादाच्या कचाट्यात सुद्धा सापडतात. याच दरम्यान अशी बातमी समोर येत आहे की, प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर (Ekta Kapoor) हिची आगामी वेब सीरिज सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर एकतावर आता चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. खरंतर एकता कपूरवर पोस्टर चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. तर आपली ALT बालाजीची वेब सीरिज 'हिच स्टोरी' सध्या चर्चेत आहे. याचे पोस्टर ही रिलिज करण्यात आले आहे. मात्र हे पोस्टर पाहून तुम्हाला वाटेल की समलैंगिकतेच्या विषयावर आधारित आहे.
या पोस्टरमध्ये सत्यदीप मिश्री आणि मृणाल दत्त दिसून येत आहे. याच पोस्टर सारखी 2015 मध्ये LOEV हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर चित्रपटाचे मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट आणि आर्ट डायरेक्टर जहान बक्शी यांनी एकता कपूरवर साहित्यिक चोरी करण्याचा आरोप लावला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, एकताच्या सीरिजची कथा सुद्धा त्यांच्या चित्रपटाची कॉपी आहे. जहान बक्शी यांनी एक ट्विट करत त्यांचा चित्रपट आणि एकताच्या सीरिजचा पोस्टर एकत्रित शेअर केला आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, भाई ऑल्ट बालाजी तुम्ही ठिक आहात ना? जर तुम्हाला पोस्टर डिझाइन करायचे होते तर मी मदत करु शकतो. मी वचन देतो की ते ऐवढे महाग नसेल.(Aishwarya Rai नंतर Karisma Kapoor सारख्या दिसणाऱ्या तरुणीचे Photos आणि Videos सोशल मीडियावर व्हायरल; हुबेहुब अभिनेत्रीची कार्बन कॉपी आहे 'ही' महिला)
Tweet:
या वादानंतर वाढत असल्याने ऑल्ट बालाजी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, त्यांनी हे जाणूनबुझून केलेले नाही. ऑल्ट बालाजीच्या प्रवक्तांनी म्हटले की, सर्व कलाकारांचा आम्ही सम्मान करतो. आम्ही कोणत्याही कलाकाराची मेहनत चोरी करत नाही. सीरिजचे पोस्टर तयार करण्यासाठी बहुतांश जण जोडले गेले आहेत. यावर सुद्धा आम्ही काम करत आहोत.