Shah Rukh Khan Birthday Special: 'देवदास' ते 'डियर जिंदगी' शाहरूख खान च्या बॉलिवूड सिनेकारकीर्दीमधील हे '10' सिनेमे आहेत सुपरहीट

शाहरुख खानला सर्व योग्य कारणांसाठी बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखले जाते. आज, 2 नोव्हेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या काही उत्कृष्ट चित्रपटांची एक झलक.

शाहरुख खान (Photo Credits: Twitter)

2 नोव्हेंबर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) वाढदिवस. शाहरुखला इंडस्ट्रीत किंग खान का म्हटले जाते याचे उत्तर आपल्या सगळ्यानां माहिती आहे. ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान आज ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. विविध चित्रपटातून राहुल, राज, डॉन अशा भूमिका साकारणाऱ्या किंग खानने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. भारतात आणि भारताबाहेर शाहरुखचा तुफान चाहतावर्ग आहे. त्याच्या डायलॅाग ते अगदी दोन हात हवेत पसरवून त्याची ‘सिग्नेचर’ पोझ देण्यापर्यंतच्या त्याच्या अंदाजावर अनेकजण फिदा आहेत.

आज आपण त्याच्या सिनेकारकीर्दीमधील  '16' सुपरहिट्ट चित्रपटाची झळक बघणार आहोत.

1. Shah Rukh Khan Movie - Deewana (1992)

शाहरुख खानचा दिवाना हा डेब्यू चित्रपट मानला जात होता. दिवाना हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आणि या हिंदी चित्रपटसृष्टीला सर्वात प्रतिष्ठित स्टार मिळाला. या चित्रपटात त्याने ऋषी कपूरसोबत काम केले. जो अभिनेता दोन दशकांपासून रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखला जात होता, परंतु SRK च्या प्रवेशाने समीकरण बदलले.

2. Shah Rukh Khan Movie - Baazigar (1993)

अब्बास मस्तान दिग्दर्शित या रहस्यपटाने त्या काळी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.  या चित्रपटात काजोल आणि शाहरूख या जोडीचा हा पहिला चित्रपट होता.

3. Shah Rukh Khan Movie - Darr (1993)

यश चौपरा दिग्दर्शित डर या चित्रपटात शाहरुख ने एका प्रेमी विलनची भुमिका स्विकारली होती. ही भूमिका त्याचीं प्रंचड गाजली होती पण हिंसक ही होती.

4. Shah Rukh Khan Movie - Karan Arjun (1995)

शाहरुख आणि सलमान खान ही जोडी या चित्रपटात पहिल्यादा एकत्र दिसुन आली हाेती.

5. Shah Rukh Khan Movie - Dilwale Dulhaiya Le Jayenge (1995)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

हा चित्रपट खुप प्रंचड हिट ठरलेला. या चित्रपटाची जादु आजही प्रेक्षकांच्या  मनावर घर करुन आहे.

6. Shah Rukh Khan Movie - Dil To Pagal Hai (1997)

करिष्मा कपूर, शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित हि जोडी या चित्रपटात एकत्र दिसून अली होती, हा चित्रपट बॉक्सआफिस  हिट ठरला होता.

7. Shah Rukh Khan Movie - Kuch Kuch Hota Hai (1998)

करण जौहरने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. काजोल, राणी मुखर्जी आणि शाहरुख खान जोडी  एकत्र दिसून आली होती

8. Shah Rukh Khan Movie - Devdas (2002)

‘देवदास’ हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात  ऐश्वर्या राय, माधुरी आणि शाहरुख हे तिघ  एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले.

9. Shah Rukh Khan Movie - Chak De! India (2007)

2007 मध्ये आलेला हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. आजही लोक या चित्रपटाशी त्याच पद्धतीने जोडले गेले आहेत.

10Shah Rukh Khan Movie - Dear Zindagi (2016)

अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. प्रेक्षकांनमध्येही ‘डिअर जिंदगी’ची भुरळ पडली होती

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

 

View this post on Instagram

 

 

‘फौजी’ या मालिकेद्वारे शाहरुखची वाटचाल सुरु झाली. त्यानंतर ‘दिवाना’ या चित्रपटापासून सुरु झालेला शाहरुखचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आजतागायत सुरुच आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement