Happy Birthday Asha Bhosle: संगीत क्षेत्रात Indie Pop ची राणी असलेल्या आशा भोसलेंबाबत काही खास गोष्टी!
आशा भोसले यांनी 'हवाहवाई' या आगामी सिनेमासाठी काही दिवसांपूर्वीच पार्श्वगायन केले आहे. आज वयाच्या 89 दी मध्ये ही त्यांच्यामधील उत्साह तरूणांना लाजवणारा आहे.
मराठी भावसंगीत असो किंवा बॉलिवूड मध्ये कॅब्रे सॉन्ग प्रत्येक गाण्यागणिक आपली शैली लिलया बदलणार्या आशा ताई अर्थात आशा भोसले (Asha Bhosle) आज आपला 89 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मंगेशकरांच्या घरात जन्मलेल्या आशा भोसले यांच्यावर लहानपणापासून संगीताचे, नाट्य संगीताचे संस्कार झाले होते. पुढे आशा भोसले यांनी देखील संगीत क्षेत्रचं आपलं करिअर म्हणून निवडलं आणि बघता बघता नवनवी शिखरं पादाक्रांत करत गेल्या. आज आशा भोसले हे नाव केवळ महराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेले नाही त्याने जगात आपली ओळख निर्माण केली आहे. 88 वर्ष पूर्ण करून 89 व्या वर्षात पदार्पण करणार्या आशा भोसलेंबाबत आजही अनेकांना क्वचितच ठाऊक असलेल्या या काही खास गोष्टी! (नक्की वाचा: आशा भोसले यांनी 86 व्या वर्षी लॉन्च केले युट्युब चॅनल; 'या' गाण्याच्या व्हिडिओसह केला चॅनलचा शुभारंभ).
आशा भोसलेंबाबत काही खास गोष्टी
- आशा भोसले यांनी युनिव्हर्सिटी ऑफ जळगाव आणि अमरावती मधून 'साहित्या'मध्ये Honorary Doctorates पदवी मिळवली आहे.
- वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रात की राणी या सिनेमासाठी त्यांनी 1949 साली त्यांनी पहिलं गाणं गायलं आहे.
- 1954 साली मोहम्मद रफी यांच्यासोबत 'नन्हे मुन्हे बच्चे' गाण्यानंतर त्या बॉलिवूड मध्ये प्रकाशझोकात आल्या.
- हिंदी सोबतच आशा भोसलेंनी 12 विविध भारतीय भाषांमध्ये 12 हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. यामध्ये मराठी, बंगाली, मल्याळम, सिंहला भाषेचा देखील समावेश आहे.
- 'ग्रॅमी' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी त्या नॉमिनेट झालेल्या पहिल्या भारतीय गायिका होत्या.
- पद्मविभुषण, दादासाहेब फाळके पुरस्कार ते नुकताच महाराष्ट्र भूषण सारख्या देशातील मानाच्या पुरस्कारांवर त्यांनी नाव कोरलं आहे.
- अमेरिकेच्या दौर्यावर असताना 20 दिवसांत त्यांनी 13 शहरांत कार्यक्रम केले होते.
- Manchester’s University of Salford मधून त्यांना नवपिढीला प्रेरणास्थान असलेल्या आशाताईंना Honorary Doctorate
म्हणून पुरस्कार दिला आहे.
- 2006 साली ‘You're the One for Me’यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट ली सोबतची त्यांनी गाणं गायलं आहे.
- गाण्यासोबत खवय्या असलेल्या आशा भोसलेंनी दुबई, अबुधाबी, मॅन्चेस्टर, बर्हिंगहॅम मध्ये आपली रेस्टॉरंट चेन सुरू केली आहे.
- दरम्यान काही दिवसांपूर्वीच आशा भोसले यांनी 'हवाहवाई' या आगामी सिनेमासाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
आशा भोसले कोविड संकटाच्या काळात बरेच महिने मुंबईपासून दूर लोणावळा मध्ये राहत होत्या. नातवंडांसोबत त्या आपला वेळ घालवत होत्या. मध्यंतरी त्या मुंबईमध्ये आल्या होत्या. आता लवकर लाईव्ह शोज सुरू व्हावेत अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)