Mahabharat ने घातली अजून एका Celebrity ला भुरळ; Deepika Padukone साकारणार द्रौपदी

महाभारतावर आलेल्या मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आता या कथासूत्राचा मोह बॉलीवूड मधील सेलिब्रिटींना सुद्धा पडला आहे. दीपिका पदुकोन (Deepika Padukone) आता महाभारतातील द्रौपदीचं पात्र साकारणार आहे.

Deepika Padukone | (Instagram)

महाभारताची (Mahabharat) कथा, तिचा आवाका आणि त्याची पात्रं ही नेहमीच प्रेक्षकांना मोहात पाडणारी ठरली आहेत. महाभारतावर आलेल्या मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आता या कथासूत्राचा मोह बॉलीवूड मधील सेलिब्रिटींना सुद्धा पडला आहे. दीपिका पदुकोन (Deepika Padukone) आता महाभारतातील द्रौपदीचं पात्र साकारणार आहे. आणि विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मितीसुद्धा दीपिकाच करणार असल्याचं बोललं जात आहे.

महाभारतावरील हा चित्रपटाचे दोन भाग असणार आहेत, पैकी एक भाग पुढल्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत दीपिकाला विचारले असता, ही भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासष्ठी आनंदाची आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भूमिका ठरू शकते. (हेही वाचा. Diwali ला चाहत्यांसाठी खास पर्वणी; हे चित्रपट होणार Box Office वर आज Release)

या चित्रपटाची सहनिर्मिती करणारी मधू मन्टेना म्हणते, आपण आयुष्यभर महाभारत वाचत आलो आहे. पण या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे महाभारताची कथा द्रौपदीच्या नजरेतून मांडण्यात येणार आहे. आणि दीपिका पदुकोण ही ग्लोबल स्टार आहे. त्यामुळे ह्या कथेचा आवाका वाढण्यास त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शक आणि इतर कलाकारांसाठी आता शोध मोहीम सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी आमिर खान (Aamir Khan) महाभारतावर एक वेब सिरीज काढणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्याच्या या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मध्ये तो श्रीकृष्णाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात होतं.



संबंधित बातम्या