बी.बी.किंग यांचा 94 वा स्मृतिदिन: अमेरिकेचे सुप्रसिद्ध गायक बी.बी किंग यांच्या 94 व्या जयंती निमित्त गुगलने बनवले खास डूडल, ऍनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून दिला त्यांच्या आठवणींना उजाळा

त्यांच्या जयंतीनिमित्त आज गुगलने आपल्या अलग अंदाजात एक अॅनिमेटेड डूडल बनवले आहे. हे डूडल लिटिल रॉकवर आधारित आहे. याला गेस्ट आर्टिस्ट स्टीव स्पेंसर (Steve Spencer) ने बनवले आहे आणि याचे अॅनिमेन नयेली लवांडरोस (Nayeli Lavanderos) गेस्ट एनिमेटर ने बनवले आहे.

BB King Google doodle (Photo Credits: Google)

BB King's 94th Birthday Google Doodle: ब्लूज आणि जॅज सारख्या पठडीतील संगीताला आपल्या आवाजातून लोकांसमोर आणणारे अमेरिकेचे सुप्रसिद्ध गायक बी.बी. किंग यांची आज 94 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त आज गुगलने आपल्या अलग अंदाजात एक अॅनिमेटेड डूडल बनवले आहे. हे डूडल लिटिल रॉकवर आधारित आहे. याला गेस्ट आर्टिस्ट स्टीव स्पेंसर (Steve Spencer) ने बनवले आहे आणि याचे अॅनिमेन नयेली लवांडरोस (Nayeli Lavanderos) गेस्ट एनिमेटर ने बनवले आहे. जेव्हा ब्लूज आणि जॅज सारख्या पॉप गाण्यांचा उल्लेख होतो तेव्हा बी.बी किंग हे नाव आर्वजून घेतले जाते.

डूडलमध्ये बी.बी.किंग यांनी काळ्या रंगाचे जॅकेट घालून या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते हातात गितार घेऊन गाणे गात आहे.गुगल डूडलवर क्लिक केल्यावर आपण यूट्युबच्या लिंकवर जाल जेथे तुम्हाला 2 मिनिट 10 सेकंदाचा व्हिडिओ दिसेल. या व्हिडिओच्या माध्यमातून पॉप किंगच्या आयुष्याचे संपुर्ण स्वरुप संक्षिप्तरित्या आपल्या समोर येईल.

बी.बी.किंग यांचा जन्म 16 सप्टेंबर 1925 ला बर्कलेयर (Berclair) च्या मिसिसीपी (Mississippi)च्या छोट्याशा डेल्टा समुदायमध्ये इंडियानोला पासून जवळपास 20 मैल दूर झाला होता. त्यांचे पूर्ण नाव रिले बी किंग (Riley B.King)असे होते. त्यांचे वडिल शेयरक्रॉपर होते. किंग प्रसिद्ध होण्याच्या आधी बी.बी.किंग चर्च आणि रस्त्यांवर गाणे गायचे. रस्त्यांवर गाणे गात असताना लोक त्यांना 'Beale Street Blues Boy' असे संबोधू लागले. हेही वाचा- शिक्षक दिन 2019: Teachers' Day निमित्त Google होम पेजवर खास Doodle

त्यानतर 1949 मध्ये त्यांना आपले पहिले गाणे 'थ्री ओ क्लॉक ब्लूज' रेकॉर्ड केले जे खूपच सुपरहिट झाले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. बी.बी.किंग 15 वेळा ग्रॅमी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत आणि रॉक अँड रोल हॉल ऑफ फेमचे सदस्यही राहिले आहेत. 'द थ्रिल गॉन' आणि 'एवरी डे आय हॅव द ब्लूज' ही त्यांची लोकप्रिय गाणी होती.

बी.बी.किंग ची प्रोफेशनल लाइफ खूपच यशस्वी राहिली मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र म्हणांव तितके यशस्वी झाले नाही. त्यांनी 2 लग्नं केली. मात्र ती अयशस्वी ठरली. पहिले लग्न त्यांनी मार्था ली डेंटन (Martha Lee Denton) तर दुसरे लग्न सू कॅरोल हॉल (Sue Carol Hall) हिच्याशी केलं. मात्र लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. 1987 मध्ये त्यांनी रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम जिंकले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now