Gehana Vasisth: सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडल्याचा गहना वशिष्ठ हिचा धक्कादायक खुलासा

तर गहना हिच्यासोबत अन्य तीन जणांच्या विरोधात सामूहिक बलात्कार आणि चुकीचे वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Gehana Vasisth (Photo Credit: Instagram)

Gehana Vasisth:  अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला 87 पॉर्न व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर गहना हिच्यासोबत अन्य तीन जणांच्या विरोधात सामूहिक बलात्कार आणि चुकीचे वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण अशावेळी समोर आले जेव्हा 24 वर्षीय मॉडेलला तीन पुरुषांसोबत सेक्शुअल अॅक्ट करण्यास भाग पाडले गेले. याबद्दल गहना हिने असा आरोप केला आहे की, तिला सेक्स सीन्स करण्याबद्दल काहीच सांगण्यात आले नव्हते.(Gehana Vasisth: गहना वशिष्ठ एका पार्न व्हिडीओतून किती पैसे कमवायची? पोलीस चौकशीतून अशी माहिती आली समोर)

मुंबईत सॉफ्ट पॉर्नच्या शुटिंग रॅकेट प्रकरणी अभिनेत्री गहना उर्फ वंदना तिवारी हिला रविवारी (7 फेब्रुवारी) अटक करण्यात आली होती. त्यानंतर उमेश कामत नावाच्या व्यक्तीला सुद्धा अटक केली गेली. कामत हा परदेशातील असलेल्या सर्वरवर चित्रपट प्रदर्शित करत असे. त्याचसोबत मुंबईत शूट झालेले पॉर्न चित्रपट विदेशात कधी आणि कसे अपलोड करायचे हे काम सुद्धा कामत करत होता.

प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की, गहना हिच्याकडून पाठवण्यात आलेल्या व्हिडिओसाठी तिला अमेरिकेतील अपलोडर्सकडून दोन ते अडीच लाख रुपये मिळत होते. ज्यामधील एक लाख ती तिच्या कलाकारांसह कॅमेरामॅन आणि अन्य जणांना देत होती. पण उर्वरित रक्कम ती स्वत:ला ठेवत होती. गहना हिने कथित रुपात 87 पॉर्न व्हिडिओ शूट केले असूनते आपल्या वेबसाइटवर सुद्धा अपलोड केले आहेत.(Porn Film Shooting Racket In Mumbai: मुंबई क्राईम ब्रॅन्चच्या प्रॉपर्टी सेल कडून सुरत मध्ये 40 वर्षीय व्यक्तीला अटक; आतापर्यंत अभिनेत्री Gehana Vasisth सह 9 जणांना पोलिसांच्या बेड्या)

मुंबई पोलिसांच्या मते पॉर्न व्हिडिओ शूटिंगच्या रॅकेटमध्ये बॉलिवूड संबंधित काही मोठी नावे समोर येऊ शकतात. यामध्येच पोलिसांनी पॉर्न फिल्म बनवणाऱ्या एका प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश ही केला आहे. ही कंपनी स्ट्रगलिंग कलाकारांना शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्यासाठी करार तयार करत होते. पण शूटिंगवेळी न्यूड शूटसाठी नकार दिल्यास त्यांच्यावर गु्न्हा दाखल करु अशी धमकी सुद्धा देत असत. या प्रकरणी पोलिसांनी मलाड मधील मढ मधील ग्रीन पार्क बंगल्यावर छापेमारी करत पाच जणांना अटक केली होती.