Youtuber Dhruv Rathee Shares Baby Boy Picture: प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी बनला बाबा; मुलाचे फोटोज शेअर करत दिली गुडन्यूज
ध्रुव राठीने आपल्या मुलाचे फोटोज त्याच्या एक्स हँडलवर शेअर केले आहे. ध्रुवच्या जर्मन पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
Youtuber Dhruv Rathee Shares Baby Boy Picture: प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी (Youtuber Dhruv Rathee) बाबा बनला आहे. शनिवारी संध्याकाळी त्याने आपल्या सर्व चाहत्यांना सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली. ध्रुव राठीने आपल्या मुलाचे फोटोज त्याच्या एक्स हँडलवर शेअर केले आहे. ध्रुवच्या जर्मन पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
ध्रुव राठीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवजात मुलाचे फोटोज शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना ध्रुवने आपल्या चाहत्यांना तो वडील बनल्याची आनंदाची बातमी सांगितली आहे. यातीस एका फोटोमध्ये तो बाळाला मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहे. तर दुसर्या फोटोमध्ये त्याने आपल्या मुलाचा चेहरा उघड केला आहे. (हेही वाचा -Dhruv Rathee Summoned:भाजप नेते सुरेश नखुआ यांच्या मानहानी प्रकरणात युट्यूबर ध्रुव राठी याला दिल्ली न्यायालयाचे समन्स)
ध्रुव राठीने 9 जुलै रोजी इन्स्टाग्राम हँडलवर पत्नी ज्युलीबरोबरचे काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याची पत्नी ज्युली बेबी बंप दाखवताना दिसत आहे. या फोटोद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना तो वडील होणार असल्याचं सांगितलं होतं. लग्नानंतरचे हे त्याचे पहिले मूल आहे. कित्येक वर्षे एकमेकांना डेटिंग केल्यानंतर, ध्रुव्हने 24 नोव्हेंबर 2021 रोजी धुरोस्ट्रियाच्या व्हिएन्ना येथील बेलवाडियर पॅलेस येथे ज्युलीशी लग्न केले.
यूट्यूबर ध्रुव राठी बनला बाबा -
Welcoming our little baby boy to the world ♥️ pic.twitter.com/pv07hghrgx
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) September 21, 2024
ध्रुव राठी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच, एल्विश यादव याच्याबरोबर सोशल मीडियावर त्याचा बराच वाद झाला, ज्याची बरीच चर्चा झाली होती. ध्रुव बर्याचदा त्याच्या YouTube व्हिडिओंमध्ये ट्रेंडिंगच्या मुद्द्यांवरील तथ्यांवर बोलत असतो. ध्रूव राठीचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर तो नेहमी अॅक्टिव्ह असतो.
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2024 07:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

