Drugs Case: धर्मा प्रोडक्शनचे माजी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर शिक्षित प्रसाद यांना जामिन पण तुरुंगातून सुटका नाहीच, 'हे' आहे कारण
तर जवळजवळ 2 महिन्यानंतर त्यांना कोर्टाकडून जामिन दिला गेला
Drugs Case: धर्मा प्रोडक्शनचे (Dharma Production) माजी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर क्षितीज रवि प्रसाद (Kshitij Ravi Prasad) यांना ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. तर जवळजवळ 2 महिन्यानंतर त्यांना कोर्टाकडून जामिन दिला गेला. मात्र मुंबईतील विशेष NDPS कोर्टाकडून 50 हजार रुपयांच्या खासगी बाँडवर प्रसाद यांना जामिन दिला आहे. तसेच क्षितीज रवि प्रसाद यांनी जामिनासाठी त्यांचा पासपोर्ट सुद्धा जमा केला आहे. परंतु जामिन मिळाला असला तरीही क्षितीज रवि प्रसाद यांची तुरुंगात सुटका नाही होणार आहे.(Firoz Nadiadwala Wife Arrested by NCB: निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला एनसीबीकडून अटक)
वकील सतीश मानशिंदे यांनी असे म्हटले आहे की, क्षितीज रवी प्रसाद यांना तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही आहे. कारण त्यांचा आणखी एका प्रकरणात समावेश असून त्याची सुनावणी येत्या 3 डिसेंबरला पार पडणार आहे.(Bharti Singh-Haarsh Limbachiyaa: भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्स प्रकरणी जामीन मंजूर)
दरम्यान, क्षितीज रवि प्रसाद यांना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणात ड्रग्ज प्रकरण समोर आल्याने त्यांची चौकशी केली गेली. त्यानंतर क्षितीज रवि प्रसाद यांना एडीपीएस कायद्याअंतर्गत 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. विशेष एनडीपीएस कोर्टाचे न्यायाधीश जी बी गुरव यांनी प्रसाद यांना जामिन दिला.
कोर्टाने क्षितीज रवि प्रसाद यांना परवानगी शिवाय देशाबाहेर जाणे , पुरव्यांसोबत छेडछाड न करणे आणि तपासात कोणतीही बाधा न आणण्याचे निर्देशन दिले आहेत. प्रसाद यांनी असा आरोप लगावला आहे की, एनसीबीने त्यांना फसवले आहे. कारण त्यांनी दिग्दर्शक करण जौहर आणि अन्य बॉलिवूड कलाकारांच्या विरोधात खोटी जबाब देण्यास विरोध केला होता. परंतु एजेंसीने त्यांचे आरोप फेटाळून लावले होते. याच दरम्यान, विशेष कोर्टाने संबंधित ड्रग्ज विक्रेता ड्वेन फर्नांडिस याला सुद्धा जामिन दिलाआहे. तर ड्रग्ज प्रकरणी अद्याप एनसीबीकडून कारवाई केली जात आहे.