कॅन्सर वर मात पुन्हा सज्ज झालेल्या शरद पोंक्षे साठी किशोर कदम यांचा भावनिक संदेश

तू ‘तू’ आहेस हेही प्रेमात पडण्यासारखंच आहे,’अशा शब्दांत त्यांनी शरद पोंक्षेच्या धैर्याची, जिद्दीची दाद दिली आहे.

Sharad Ponkshe (Photo Credits: Facebook)

परखड भाषेत बोलणारा, खलनायक साकारूनही सार्‍यांना हवाहवासा वाटणारा अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांचे सध्या सोशल मीडियात व्हायरल होणारे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. मागील सहा महिन्यांपासून कॅन्सरवर मात करून आता पुन्हा शरद पोंक्षे काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतीच त्यांनी 'हिमालयाची सावली' या नाटकाच्या तालिमेला हजेरी लावली. या वेळेस पहिल्यांदाच त्याचा कॅन्सर सोबत असलेला लढा समोर आला. सामान्य नागरिकांप्रमाणेच सिनेसृष्टीतील कलाकारांनीही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून कवी किशोर कदम यांनी शरद पोक्षेंसाठी खास मेसेज लिहला आहे.

शरद पोंक्षेंसाठी पोस्ट लिहताना, तू ‘हिमालयाची सावली’ करतो आहेस हे तुझ्या डेडिकेशनचं फळ आहे. तू ‘तू’ आहेस हेही प्रेमात पडण्यासारखंच आहे,’अशा शब्दांत त्यांनी शरद पोंक्षेच्या धैर्याची, जिद्दीची दाद दिली आहे.

किशोर कदम याची संपूर्ण पोस्ट

डिसेंबर 2018 मध्ये शरद पोंक्षेंना कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर कटाक्षाने शरद पोक्षें यांनी या काळात कामापासून थोडं लांब राहण्याचा निर्णय घेतला. मात्र उपचार पूर्ण झाल्यानंतर आता शरद पोक्षे अभिनयाकडे वळले आहेत. राजेश देशपांडे दिग्दर्शित 'हिमालयाची सावली' या नाटकात ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यासोबतच अग्निहोत्र 2 मध्येही ते झळकणार असल्याच वृत्त आहे.