मराठी रंगभूमी दिन निमित्त 'ही' पाच चर्चेतील धम्माल मराठी नाटकं आवर्जून पाहा
आज रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आपण सध्या मराठी रंगभूमीवरील 5 अशी नाटकं पाहणार आहोत ज्यांनी नेहमीपेक्षा वेगळा पण तरीही आपलासा भासणारा विषय मांडत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला आहे.
जागतिक स्तरावर रंगभूमी दिनाचं (World Theater Day) सेलिब्रेशन 27 मार्च या दिवशी होतं असलं तरी महाराष्ट्रात आज म्हणजेच 5 नोव्हेंबर या दिवशी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन (Marathi Rangbhumi Din) साजरा केला जातो. 1843 साली विष्णुदास भावे (Vishnudas Bhave) यांच्या सीता स्वयंवर या नाटकातून उदयास आलेली मराठी नाटक संस्कृती आज आपला 170 वर्षांचा अनुभव आणि परंपरा जपत रसिकांचे मनोरंजन करत आहे. निश्चितच कालानुरुप या रंगभूमीवर हाताळले जाणारे विषय बदलत गेले आहेत, धार्मिक कथानकाच्या जोडीने आता विज्ञान, तंत्रज्ञान इथपासून ते ऐतिहासिक, कौटुंबिक नातेसंबंध दाखवणरे विषय ही अगदी लीलया सादर केले जात आहेत. आज रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आपण सध्या मराठी रंगभूमीवरील 5 अशी नाटकं पाहणार आहोत ज्यांनी नेहमीपेक्षा वेगळा पण तरीही आपलासा भासणारा विषय मांडत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला आहे.
नाट्यक्षेत्रात मराठी रंगभूमी ही पूर्वीपासूनच एक अग्रगण्य स्थानी होती. मध्यंतरी हा वेग काहीसा मंदावला असला तरी आता बड्या बड्या कंपन्यांनी नाटक व्यवसायात पदार्पण केल्याने एका अर्थाने मराठी नाटकाला पुनरुज्जीवन लाभले आहे. या पैकी काही नाटकं ही नवीकोरी आहेत तर काही जुन्या नाटकांचे नवे रिमेक आहेत.
मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो? जाणून घ्या
दादा एक गुड न्यूज आहे
व्हॅक्युम क्लिनर
शांतेचं कार्ट चालू आहे
View this post on Instagram
Come to see and enjoy the play
A post shared by Sunil Tawade (@tawades) on
संगीत देवबाभळी
कुसुम मनोहर लेले
सिनेमा, मालिका किंवा अगदी डिजिटल मीडियामध्येही तंत्रज्ञानाच्या मदतीने कितीही सुपर इफेक्ट्स किंवा कल्पनाशक्ती पलिकडीकडील जग पाहता येत असलं तरीही कलाकारांना लाईव्ह रंगमंचावर पाहता येणं. त्या किमान अडीच ते तीन तासांचा अनुभव हा कलाकरांइतकाच रसिकांनाही समृद्ध करणारा असतो. त्यामुळे महिन्यातून किमान एकदा नाटक पाहण्याचा अनुभव घ्यायलाच हवा. आजवर तुम्ही कोणती नाटकं पाहिलीत आणि त्यातील तुमची सर्वात आवडलेली नाटकं कोणती हे आम्हाला नक्की कळवा..