Coronavirus: नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना व्हायरस संसर्ग, लीलावती रुग्णलयात उपचार सुरु
तेव्हापासून ते आपल्या घरीच होते. गेले काही दिवस त्यांना प्रकृतीच्या साधारण तक्रारी होत्या. मात्र, आज त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मराठी रंगभूमीवरील महत्त्वाचे नाव आणि नाट्य दिग्दर्शक (Drama Director) विजय केंकरे (Vijay Kenkare यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. केंकरे यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्यांना लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासूनच केंकरे यांच्यात कोरोना व्हायरस लक्षणं दिसत होती. त्यामुळे ते होम क्वारंटाईन होते. काही दिवसांपासून त्यांना सौम्य ताप येत होता. अखेर त्यांची कोविड 19 चचणी करण्यात आली. जी पॉझिटिव्ह आली.
विजय केंकरे यांच्या मातोश्री ललिता केंकरे यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झालं होत. तेव्हापासून ते आपल्या घरीच होते. गेले काही दिवस त्यांना प्रकृतीच्या साधारण तक्रारी होत्या. मात्र, आज त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभनेते विनय येडेकर यांनी केंकरे यांच्याबाबत माहिती देताना सांगितले की, काही दिसांपासून त्यांना सौम्य ताप येत होता. त्यामुळे त्यांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉजिटिव आला. (हेही वाचा, Coronavirus: राज्यात आज दिवसभरात कोरोना संक्रमित 11,514 रुग्णांची नोंद, 316 जणांचा मृत्यू)
दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 11,514 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 316 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 4,79,779 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 1,46,305, उपचार घेऊन रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्या 3,16,375 आणि मृत्यू झालेल्या 16,792 जणांचा समावेश आहे.