'अलबत्या गलबत्या' नाटकाच्या चालू प्रयोगादरम्यान वैभव मांगले स्टेजवर कोसळला; क्रांती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

अलबत्या गलबत्या या नाटकामध्ये वैभव मांगले चेटकीणीची प्रमुख भूमिका करत आहे.

Vaibhav Mangle (Photo Credits: Instagram)

अलबत्या गलबत्या (Albattya Galbattya) नाटकाच्या प्रयोगा दरम्यान आज अभिनेता वैभव  मांगले (Vaibhav Mangle) स्टेजवरच कोसळला.  सध्या  त्याच्यावर  सांगलीतील  क्रांती  हॉस्पिटल मध्ये  उपचार  सुरू  आहेत.  आज  सांगलीमध्ये (Sangli)  विष्णूदास भावे (vishnudas Bhave) नाट्यगृहात नाटकाचा  प्रयोग  होता. प्रयोगादरम्यान  वैभव  स्टेजवरच कोसळला. त्याला  चक्कर  आली  असं  सांगून नाटकाचा  प्रयोग  थांबवण्यात आला. Network 18 मराठीने  दिलेल्या  वृत्तानुसार  वैभव  मांगलेला अशक्तपणामुळे चक्कर  आली असे संयोजकांनी सांगितले  आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

झी  मराठी  प्रस्तुत आणि  चिन्मय  मांडलेकर दिग्दर्शित अलबत्त्या गलबत्त्या हे  बालनाट्य मराठी  रंगभूमीवर  जोरदार  सुरू आहे.  या नाटका मध्ये  वैभव मांगले  चेटकीणीची  प्रमुख  भूमिका करत  आहे. सध्या  मुलांना  उन्हाळी सुट्ट्या असल्याने  महाराष्ट्रभर या  नाटकाचे  प्रयोग  हाऊस फुल्ल सुरू आहेत. या नाटकाचा आजचा शो सांगली, पळूस मध्ये  होता. उद्या कोल्हापुरात 3 त्यानंतर परवा कराड, सातारा आणि सोमवारी (29 एप्रिल) मुंबई मध्ये  या  नाटकचे  प्रयोग लावण्यात आले आहेत. मराठी रंगभूमी वर सुरू असलेली ही '5' सध्याची धम्माल नाटकं पाहिलीत का?

नाटकाच्या 100  व्या  प्रयोगा वेळेस एका दिवशी   पाच  प्रयोग करण्याचा विक्रम  या  नाटकाच्या नावावर  आहे. आताही महाराष्ट्रभर  विश्व विक्रमी दौरे करण्याच्या तयारीत या  नाटकाचे कलाकार  होते.