अभिनेता अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका; 'सुंदर मी होणार' नाटकात आता त्यांच्याऐवजी झळकणार अनिरुद्ध जोशी

दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी अमोल बावडेकरच्या जागी अनिरुद्ध जोशी नाटकात झळकतील अशी माहिती देण्यात आली आहे. 'सुरेश' नावाच्या एका लाजर्‍या बुजर्‍या ते आत्मविश्वासू गायकाची भूमिका आता अमोल ऐवजी अनिरूद्ध सादर करणार आहे.

Aniruddha Joshi To replace Amol Bawdekar in Sundar Me Honar | Insatagram/ Rajesh Deshpande

महाराष्ट्रभूषण पु ल देशपांडे लिखित 'सुंदर मी होणार' (Sundar Mee Honaar)  नाटक  30 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर आलं आहे. 12 जून या पुलं च्या 25 व्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग सुरू झाले आहेत. मात्र 15 जूनला सकाळी अभिनेता अमोल बावडेकर (Amol Bavdekar) यांना हृद्यविकाराचा झटका आल्याने आता या नाटकात अभिनेता-गायक अनिरूद्ध जोशी (Aniruddha Joshi) याची एंट्री होणार आहे. 14 जूनला वाशी मध्ये 'सुंदर मी होणार' चं सादरीकरण करतानाच अमोल बावडेकर यांना त्रास होत होता पण त्यांनी तो रेटून नेला. नंतर दुसर्‍या दिवशी त्यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांच्यावर अ‍ॅन्जिओग्राफी करण्यात आली. रविवार सकाळचा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहातील प्रयोग रद्द करण्यात आला.

सुंदर मी होणार नाटकाचे प्रयोग आता 22 जून पासून पुन्हा सुरू होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी अमोल बावडेकरच्या जागी अनिरुद्ध जोशी नाटकात झळकतील अशी माहिती देण्यात आली आहे. 'सुरेश' नावाच्या एका लाजर्‍या बुजर्‍या ते आत्मविश्वासू  गायकाची भूमिका आता अमोल ऐवजी अनिरूद्ध सादर करणार आहे.

अ‍ॅन्जिओग्राफी पूर्वी प्रयोग करण्याची मागितली होती परवानगी

राजेश देशपांडे यांनी मटा शी बोलताना या बाबत प्रतिक्रिया देताना 'अमोलने हृद्यविकाराच्या झटक्यानंतर अ‍ॅन्जिओग्राफी च्या शस्त्रक्रियेपूर्वी थोडा वेळ द्या नाटकाचा प्रयोग करून येतो. मग ऑपरेशन करा असं म्हटलं. परंतू डॉक्टरांनी तशी परवानगी नाकारल्याचं सांगितलं.

सुंदर मी होणार नाटकामध्ये विद्याधर जोशी, अभिजीत चव्हाण, स्वानंदी टिकेकर, सृजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर आणि आस्ताद काळे-श्रुजा प्रभुदेसाई आदी कलाकार झळकणार आहेत. दरम्यान या नाटकाच्या माध्यमातून विद्याधर जोशी देखील 6-7 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येणार आहेत. फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेले विद्याधर जोशी पुन्हा रंगभूमीवर येणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement