सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा वरबाप; पाहा काय करतात 'सौंदर्या'पती जावई

मात्र, विवाहाचे विधी 9 फेब्रुवारीपासूनच सुरु होतील. विवाहापूर्वी रजनीकांत यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी एक पूजाविधी पार पडेल. सौंदर्या आणि विशगन या जोडप्याची दोन्ही घराणी वलयांकीत आणि वजनदार असल्यामुळे हा विवाह धुमधडाक्यात पार पडणार याबाबत हे काही वेगळे सांगायलाच नको.

Superstar Rajinikanth, Soundarya Rajinikanth, Vishagan Vanangamudi | (Photo courtesy: archived, edited images)

दक्षिण सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) अर्थातच आपला मराठमोळा शिवाजी गायकवाड (Shivaji Rao Gaekwad) आता दुसऱ्यांदा वरबाप होत आहे. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या (Soundarya Rajinikanth) पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढत आहे. उद्योजक अश्विन यांच्यासोबत केलेला विवाह फार काळ टिकला नाही. त्यामुळे दोघांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. आता तिने पुन्हा एकदा विवाहाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्थातच सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची कन्या सौंदर्या या दोघांच्याही चाहत्यांना उत्सुकता आहे की, अखेर सौंदर्या हिचा पती आणि रजनीकांत यांचा होणारा जावई आहे तरी कोण? अर्थात, विशगन वनांगामुडी (Vishagan Vanangamudi) हे सौंदर्याचे पती म्हणजेच रजनीकांत यांचे जावई आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. पण, ते काय करतात तुम्हाला माहिती आहे काय? घ्या जाणून...

प्राप्त माहिती अशी की, विशगन हे एका औषध कंपनीचे मालक आहेत. त्यांचे बंधू एसएस पोनमुडी हे तामिळनाडूचे प्रसिद्ध राजकीय नेते आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाचे बडे नेते आहेत. त्यामुळे विशानग हे पैसेवाले आहेत हे काही सांगण्याची गरज नाही. पण, राकारण आणि तामिळनाडूच्या राजकारणातील एक वजनदार घराणे अशीही विशगन वनांगामुडी यांची ओळख आहे. या विवाहाची तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळासर सर्वसामान्यांमध्येही जोरदार चर्चा आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा विवाह येत्या 11 फेब्रुवारीला पार पडणार आहे. मात्र, विवाहाचे विधी 9 फेब्रुवारीपासूनच सुरु होतील. विवाहापूर्वी रजनीकांत यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी एक पूजाविधी पार पडेल. सौंदर्या आणि विशगन या जोडप्याची दोन्ही घराणी वलयांकीत आणि वजनदार असल्यामुळे हा विवाह धुमधडाक्यात पार पडणार याबाबत हे काही वेगळे सांगायलाच नको.

विशेष म्हणजे, सौंदर्या रजनीकांत आणि विशगन वनांगामुडी हे दोघेही दुसऱ्यांदा विवाह करत आहेत. दोघांनीही या आधी आपापल्या जोडीदारापासून घटस्फोट घेतला आहे. सौंदर्या हिचा अश्विन राजकुमार यांच्यासोबत घटस्फोट झाला आहे. दोघांनी 2010 मध्ये विवाह केला होता. मात्र, 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्याआधी सौंदर्या हिने 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना वेद नावाचा 5 वर्षांचा मुलगाही आहे. अश्विन राजकुमार हे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. (हेही वाचा, अभिनेता रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर; विशागन वनानगामुडी याच्यासोबत थाटणार संसार)

दरम्यान, विशगन वनांगामुडी याचाही या आधी घटस्फोट झाला आहे. एका वृत्तपत्राची संपादिका कनिखा कुमारन हिच्यासोबत विशगन यांनी विवाह केला होता. मात्र, हा संसार फार काळ टीकू शकला नाही. दोघांमध्ये घटस्फोट झाल्यानंतर कनिखा कुमारन हिने वरुन मनियन यांच्यासोबत विवाह केला. वरुन मनियन हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत.