David Warner In Pushpa2 : अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'मध्ये डेव्हिड वॉर्नरची एन्ट्री? लीक झालेल्या फोटोंमुळे चर्चा

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट स्टार डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी क्रिकेटऐवजी तो सिनेविश्वात चर्चेचा विषय बनला आहे. वॉर्नर अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार असल्याच्या बातम्या आहेत. या अफवेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे, येथे जाणून घ्या, अधिक माहिती

David Warner In Pushpa2

David Warner In Pushpa2: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट स्टार डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी क्रिकेटऐवजी तो सिनेविश्वात चर्चेचा विषय बनला आहे. वॉर्नर अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार असल्याच्या बातम्या आहेत. या अफवेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे, विशेषत: काही लीक झालेल्या छायाचित्रांमध्ये वॉर्नरला सोनेरी हँडगन घेतलेल्या स्टायलिश गँगस्टर अवतारात दिसल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली आहे. वॉर्नरचे भारतीय चित्रपट, विशेषत: तेलुगु चित्रपटांबद्दलचे प्रेम, त्याच्या TikToks आणि Reels मधून दिसून येते, TikToks वर त्याने दक्षिण भारतीय ब्लॉकबस्टर्समधील प्रतिष्ठित व्हिडीओ  आणि नृत्य व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे देखील वाचा: अभिनेत्री Parvati Nair हीच्यावर मारहाणीचा आरोप, न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल

 TikTok वर टाकलेल्या व्हिडीओमुळे महामारीच्या काळात डेव्हिड वॉर्नरला भारतात खूप मोठा चाहतावर्ग मिळाला. मला 'पुष्पा 2' मध्ये अभिनय करायचा आहे, असे त्याने एकदा गमतीने सांगितले होते.

डेव्हिड वॉर्नरचा डॉन अवतार:

आता वॉर्नरचा विनोद खरा ठरला की नाही हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अलीकडच्या बातम्यांनुसार, वॉर्नर चित्रपटाच्या एका ॲक्शन सीनमध्ये दिसू शकतो. तथापि, वॉर्नर किंवा चित्रपटाची निर्मिती टीम, Mythri Movie Makers या दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. तरीही, अल्लू अर्जुन आणि वॉर्नर यांच्यातील हाय-ऑक्टेन फेस ऑफच्या कल्पनेने चाहते रोमांचित झाले आहेत.

'पुष्पा 2' हा 2021 च्या सुपरहिट चित्रपट 'पुष्पा:

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

'पुष्पा 2' हा 2021 च्या सुपरहिट चित्रपट 'पुष्पा: द राइज'चा सिक्वेल आहे. जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता आणि अल्लू अर्जुनने पुष्पराजच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जिंकला होता. दिग्दर्शक सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट शेषाचलमच्या जंगलात लाल चंदनाची तस्करी आणि त्याच्याशी संबंधित सत्तासंघर्षावर आधारित आहे.

चित्रपटाची रिलीज आधी 15 ऑगस्ट 2024 रोजी होणार होती, परंतु आता पोस्ट-प्रॉडक्शनमुळे तो 6 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या बदलामुळे 'पुष्पा 2'ची बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाशी टक्कर होऊ शकते.

विशेष म्हणजे, 'पुष्पा 2'मध्ये श्रीवल्लीची भूमिका साकारणारी रश्मिका मंदान्ना 'छावा'मध्येही दिसणार आहे, जी तिच्या चाहत्यांसाठी दुहेरी ट्रीट असेल. वॉर्नर जर या चित्रपटाचा भाग बनला तर नक्कीच चित्रपटाची उत्सुकता वाढेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now