अभिनेत्री Parvati Nair हीच्यावर मारहाणीचा आरोप, न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल
अभिनेता विजय थलापती यांच्या अॅक्शन सायन्स फिक्शन चित्रपट गॉट यातील प्रसिध्द असलेली अभिनेत्री पार्वती नायर हीच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्रीवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे.
Parvati Nair: अभिनेता विजय थलापती यांच्या अॅक्शन सायन्स फिक्शन चित्रपट गॉट यातील प्रसिध्द असलेली अभिनेत्री पार्वती नायर हीच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्रीवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तिच्या घरातील कर्मचाऱ्यांकडून आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण आता पोलिसांकडे नेण्यात आले आहे. (हेही वाचा- Janhvi Kapoor चा हटके अंदाज पाहून चाहते घायाळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल)
मिळालेल्या माहितीनुसार, पार्वती नायर यांच्या निवासस्थानी घरगुती काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नायर यांच्या मते कर्मचारी सुभाष बोस यांनी त्यांच्या घरातील 10 लाख रुपायंच्या वस्तूची चोरी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सुभाष बोस यांना अटक देखील केली होती. परंतु जेव्हा त्यांची सुटका झाली त्यावेळीस पार्वती नायर यांनी बोसवर हल्ला केला.
पार्वती आणि तिच्या आणखी पाच जणांनी बोसवर हल्ला केला. त्यांना शिवीगाळ केली. बोस यांनी आरोप केला की त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप लावण्यात आला. बोस पार्वती यांच्याकडे 2022 पासून कामाला होता. त्यांना खोलीत बंद केले आणि जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणानंतर बोस यांनी पोलिस ठाण्यात पार्वती नायर आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानंतर अभिनेत्री आणि पाच जणांविरुध्द 296 (बी), 115 (2), 351 (2) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 23, 2024 11:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

