Coronavirus: बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला कोरोना व्हायरसची लागण

लखनौ येथे कनिका हिला विलगीकरण कक्षात ठेवले असून ती काही दिवसांपूर्वी लंडन येथून भारतात आली होती

कनिका कपूर (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) हिला कोरोना व्हायरसची लागण झाली असून तिचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. लखनौ येथे कनिका हिला विलगीकरण कक्षात ठेवले असून ती काही दिवसांपूर्वी लंडन येथून भारतात आली होती. मात्र कनिका हिने तिला कोरोना झाल्याची गोष्ट लपवली आणि एका बड्या हॉटेलमध्ये थांबली होती. तेथे तिने डिनर पार्टी सुद्धा दिली होती. तसेच कनिका हिच्या घरातील मंडळी क्वार्टइन मध्ये असून पूर्णपणे वैद्यकीय सल्ला घेत आहेत. तसेच कनिकाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बॉलिवूड कलाकारांनी नागरिकांना स्वत:चा बचाव करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून आकडा 190 च्या पार गेला आहे. यामध्ये 163 भारतीय आणि 32 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यातच आता बॉलिवूडमधील गायिका कनिका हिला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. नुकतीच सोनम कपूर सुद्धा पती आनंद अहुजा याच्यासोबत लंडन येथून परतली आहे. तिने असे म्हटले आहे की, लंडन येथे कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाछी स्क्रिनिंगची पुरेशा प्रमाणात उपलब्धता नाही आहे.(CM Uddhav Thackeray on Coronavirus: मुंबई, पुणे, पिंपरी, नागपूर मध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व खाजगी कंपन्या 31 मार्च पर्यंत राहणार बंद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देशवासियांना येत्या रविवारी म्हणजेच 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. यानुसार सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सर्व नागरिकांनी घरी राहावे असे सांगण्यात आले आहे. कोरोनाविरुद्ध सध्या जागतिक युद्ध सुरु आहे याला उत्तर देण्यासाठी घरात राहणे गरजेचे आहे, तिला फिरण्याची सुट्टी समजू नये असे आवाहन ठाकरे यांनी नागरिकांना केले.